Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत अध्यक्षपद काबीज केले. मित्रपक्षांनी विश्वासात घेतले नसल्याने भाजप नाराज आहे, त्यामुळे महायुतीमध्ये समन्वयाच्या अभावावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये, विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये, मतभेद समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या खेळीमुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे.
निवडणुकीत २१ सदस्यांच्या संचालक मंडळात भाजपने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आठ आणि शिवसेनेला चार जागा मिळाल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत १२ संचालकांचे बहुमत सिद्ध केले. यामुळे भाजपला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले. मित्रपक्षांनी अध्यक्ष निवडीसाठी विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार भाजपने केली आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी १२ संचालकांना एकत्र आणून उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. जिल्हा परिषदेत भाजपने केलेल्या डावाचा हिशोब राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने बँक निवडणुकीत चुकता केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे महायुतीत समन्वयाच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Published on: Nov 20, 2026 08:36 PM
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची

