महायुती
महाराष्ट्राच्या राजकारणात २०१४ मध्ये महायुतीची स्थापन झाली आहे. ही एक राजकीय युती असून यात सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर अनेक लहान भागीदारांचा समावेश आहे.
Mahayuti Meeting: मुंबई महापालिकेसाठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण नाही!
मुंबईत महायुतीची पहिली महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजप आणि शिंदे गट शिवसेना मुंबई महापालिकेच्या जागावाटपावर चर्चा करत आहेत. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेले नाही. भाजप १५० जागांसाठी तर शिंदे गट १२५ जागांसाठी दावा करत असल्याने जागावाटप गुंतागुंतीचे ठरण्याची शक्यता आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 16, 2025
- 4:52 pm
Shinde VS Raut : इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर… शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर, रहमान डकैत कोण? हे….
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत यांनी मनसेसोबतच्या युतीची घोषणा लवकरच होईल असे संकेत दिले. याचवेळी, एकनाथ शिंदेंच्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी रहमान डकैत कोण? असा प्रतिप्रश्न करत, मुंबईच्या तिजोरीवरील दरोड्याबाबत कठोर शब्दांत भाष्य केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 16, 2025
- 3:59 pm
Ambadas Danve : चोराच्या उलट्या बोंबा, महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली… अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा
अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुकांपूर्वी महायुतीतील अंतर्गत विरोधावर आणि अडचणींवर भाष्य केले. मुंबईतील कथित लुटीच्या आरोपांवर त्यांनी भाजपला लक्ष्य केले. तसेच, अजित पवारांच्या पक्षाला बैठकांमधून वगळले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 16, 2025
- 3:40 pm
Maharashtra Municipal Elections Declared: महापालिकेच्या निवडणुका जाहीर, मुंबईसह 29 शहरांमध्ये रणधुमाळी, कुठं मैत्री अन् कुठं कुस्ती?
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे गट बहुतेक ठिकाणी युती करणार असले तरी, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत देणार आहेत. मतदार यादीतील घोळावरही आक्षेप घेण्यात आले आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 16, 2025
- 10:43 am
Municipal Election: मित्रपक्षाला विचारतो कोण? भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, महापालिकेसाठी स्वबळाची तयारी?
Municipal Corporation Election 2026: सध्या भाजपच्या अनेक उमेदवारांमध्ये धुरंधर सिनेमातील बलोच गाणं " वल्लाह खोस रक़्सा" गाजत आहे. कारण भाजपकडून लढणाऱ्यांची भाऊगर्दी वाढली आहे. महापालिकेसाठी महायुती नको असा सूर अनेक महापालिकेत आळवल्या जात आहे, काय आहे राज्यातील चित्र?
- Reporter Gajanan Umate
- Updated on: Dec 16, 2025
- 8:46 am
Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे…लाडक्या बहिणींच्या पैशांचे…आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, शिंदेंना डिवचलं!
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना फेकनाथ मिंधे संबोधत त्यांच्या सरकारवर विविध धोरणांवरून टीका केली. पागडी पुनर्विकास योजना बिल्डर्सना अनुकूल असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पोलीस गृहनिर्माण आणि मुंबई उपनगरातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांवरूनही त्यांनी शिंदे-भाजप सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांच्या घोषणा फसवी असल्याचे म्हटले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 15, 2025
- 5:32 pm
नवीन नागपूरची निर्मिती, नव्या महामार्गाने मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलणार अन् मुंबई ते लातूर अंतर फक्त 4 तासाचं… मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत घोषणांचा पाऊस
Assembly Winter Session 2025: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासाठी घोषणांचा पाऊस पाडला. यामुळे कोणत्या भागाला काय काय मिळाले ते एका क्लिकवर जाणून घ्या.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 14, 2025
- 3:09 pm
Devendra Fadnavis: अब आगे बढ़ चुका हूं मैं…हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे हृदयगीत, शेरोशायरीतून दाखवले व्हिजन
Devendra Fadnavis in Winter Session 2025: 'बदला नही, बदलाव होगा' या धोरणाच्या पुढे जात उणापुऱ्या आठवडाभराच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी अजून एक सुखद धक्का दिला. शेरोशायरीतून त्यांनी महाराष्ट्र विकासाचे व्हिजन मांडले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 14, 2025
- 1:13 pm
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! मराठी माणूस पंतप्रधानपदी? काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Marathi Person Will Become Prime Minister: देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आहे. त्यांच्या मते मराठी माणूस हा देशाच्या पंतप्रधानपदी असेल. त्यांनी हा दावा दुसऱ्यांदा केला आहे. तसेच त्यासाठी एक खास कारणही दिलं आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 16, 2025
- 3:51 pm
Ladki Bahin Yojana: ओटीपी येत नाही, ई-केवायसी प्रक्रिया अडकली? सर्व अडचणी झटदिशी होणार दूर, सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा
Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींना कडाक्याच्या थंडीत ई-केवायसी प्रक्रियेसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 31 डिसेंबर 2025 ही अखेरची मुदत आहे. पण बहिणींना ही प्रक्रिया पूर्ण जिकरीचे ठरली आहे. त्यासाठी सरकारने अजून एक दिलासा दिला आहे.
- Reporter Sanjay Sarode
- Updated on: Dec 14, 2025
- 8:42 am
Ajit Pawar: बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत योजनेत मोठा बदल; या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री? विधानसभेत अजितदादांचा मोठा इशारा
Ajit Pawar on Barti, Sarathi, Mahajyoti Scholarship: बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत योजनेत मोठा बदल होणार आहे. पारदर्शकतेसाठी सरकार पाऊल टाकत आहे. तर या योजनेत काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला नख लागणार आहे. काय आहे अपेडट? तुम्हाला माहिती आहे का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 13, 2025
- 2:37 pm
Sanjay Raut : संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, लोकशाहीचा अपमान म्हणत विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सत्ताधारी महाविकास आघाडीवर (Mahayuti) जोरदार टीका केली आहे. राज्याच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता नसल्याबद्दल त्यांनी सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हटले. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेता असणे ही मूलभूत गरज आणि संविधानाची आवश्यकता असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 13, 2025
- 2:00 pm