Devendra Fadnavis | मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही – CM फडणवीस
मुंबईतील रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर निवासस्थानाजवळ एका व्यक्तीने पिस्तूल चालवून गोळीबार केला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला, अशी माहिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी सांगितले की, घटनास्थळी असलेल्या स्कुटीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तत्पर तपास केला.
मुंबईतील रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर निवासस्थानाजवळ एका व्यक्तीने पिस्तूल चालवून गोळीबार केला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला, अशी माहिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी सांगितले की, घटनास्थळी असलेल्या स्कुटीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तत्पर तपास केला. या इन्व्हेस्टिगेशनमधून मुंबई पोलिसांचे प्रोफेशनॅलिझम स्पष्ट दिसून आले. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेषतः, बिष्णोई गटाचा ऑपरेटीव्ह शोभम लोणकर याच्या भावालाही अटक करण्यात आली असून, शुभम लोणकरलाही लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त करत सांगितले की, “कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाण्यास आम्ही जाऊ देणार नाही.”
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात

