Gudi Padwa 2026 | महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
आज हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात मराठी बांधव आपल्या घरांवर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी कुटुंबासह गुढी उभारून नववर्ष साजरे केले. यावेळी राज ठाकरे यांनी घराच्या गॅलरीत येऊ कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
आज हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात मराठी बांधव आपल्या घरांवर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करत आहेत. राज्यभरात शोभायात्रा काढल्या जात आहे. नवचैतन्य संचारल्या सारखं वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात गुढीपाडवा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जात आहे. गुढीपाडव्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी कुटुंबासह गुढी उभारून नववर्ष साजरे केले. यावेळी राज ठाकरे यांनी घराच्या गॅलरीत येऊ कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकांनंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा असणार आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. एकूणच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज प्रत्येक मराठी माणसाच्या घरावर आनंदाची गुढी उभी राहत असून नववर्षाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 19, 2026 12:43 PM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...

