Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले…
भाजप नेते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या दसरा मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. दसरा मेळावा म्हणजे विचारांचे सोनं लुटण्याचा सोहळा न राहता हास्याचा मेळावा बनला, असे बन यांनी म्हटले. ठाकरे-राऊत यांना त्यांनी कॉमेडी गँग संबोधले, ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने राजकीयदृष्ट्या नाकारले आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या दसरा मेळाव्यावर तीव्र शब्दांत टीका केली. बन यांनी संजय राऊत यांनी अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी अमित शाह यांना बिष्णोई संबोधण्याऐवजी आपल्या पक्षाची अवस्था पाहावी.
बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची तुलना लॉरेल अँड हार्डी आणि आसराणी यांच्याशी केली, तसेच त्यांच्या मेळाव्याला कॉमेडी सर्कस म्हटले. हा दसरा मेळावा विचारांचे सोनं लुटण्याऐवजी हास्याचा मेळावा ठरल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना राजकीयदृष्ट्या नाकारले आहे, असेही बन म्हणाले. एप्रिलमध्ये सत्तांतर होण्याच्या दाव्याला त्यांनी एप्रिल फूल असे संबोधले. जनता जनार्दनाने मतपेटीतून ठाकरे गटाला नाकारले असून, आता त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला नवनाथ बन यांनी दिला.
Published on: Oct 21, 2026 04:21 PM
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..

