AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्काऱ्याचं पाद्यपूजन करणं हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम आहे का? करुणा मुंडे भडकल्या; थेट मागणी काय?

करुणा मुंडे यांनी नुकताच मोठी मागणी करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. फक्त मागणीच नाही तर जोपर्यंत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

बलात्काऱ्याचं पाद्यपूजन करणं हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम आहे का? करुणा मुंडे भडकल्या; थेट मागणी काय?
Rupali Chakankar Karuna Munde
| Updated on: Mar 19, 2026 | 1:46 PM
Share

नाशिकच्या अशोक उर्फ कॅप्टन खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. काही व्हिडीओही पुढे आली आहेत. यादरम्यानच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी मोठे भाष्य केले. यासोबतच त्यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करण्यात आली. चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. करुणा मुंडे यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे. महिला आयोगाच्या अध्यक्षा एका बलात्कारी व्यक्तीच्या घरी रांगोळी काढतात आणि दुसऱ्या बलात्कारीच्या पाद्यपूजन करत आहेत. हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम आहे का? असा प्रश्नही करुणा मुंडे यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर यांना लाज वाटली पाहिजे.. महिला आयोग पद संविधानिक आणि जबाबदारी पद आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणजे असे बलात्कारी साधुसंत आणि नेता लोकांच्या पाठीशी घालणार आहे का? संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना करुणा मुंडे यांनी म्हटले, माझी पण गेल्या तीन वर्षापासून राजीनामाची मागणी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीला सर्वांकडे पत्र दिलेला आहे.

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला पाहिजे. कंगना राणावत आज प्रियांका गांधींवर भाष्य करत आहेत. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर कंगना रणौत आता ड्रायक्लिन झाल्या का? यावर त्यांनी म्हटले की, प्रियंका गांधींनी आजपर्यंत आपला ओढणीही उतरू दिलेली नाही आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करत आहात. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर तुम्ही साडी परिधान करण्यास सुरुवात केली आहे आणि इतरांना चारित्र्यहिन म्हणत आहात.

आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करुणा मुंडे यांनी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करुणा मुंडे मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या  की, जोपर्यंत रुपाली चाकणकर राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सोमवारपासून मंत्रालयासमोर मी आंदोलन करणार. यासोबतच त्यांनी म्हटले की, मी  धनंजय मुंडे यांना मंत्री होऊ देणार नाही आणि त्यांचे आमदारपदही लवकरच जाणार आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!