AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, चाकणकर पुरावे नष्ट करतील; रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप

गेल्या दोन दिवसांपासून अशोक खरात हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी खरात यांना अटक केली. आता या प्रकरणावर रुपाली पाटलांनी वक्तव्य करत रुपाली चाकणकरांवार खळबळजनक आरोप केले आहेत.

मोठी बातमी! 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, चाकणकर पुरावे नष्ट करतील; रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप
Rupali patil thombareImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 19, 2026 | 1:25 PM
Share

तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांना महिलांवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचा अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी (१८ मार्च) पहाटे सुमारे तीन वाजता कारवाई करत अशोक खरात यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

प्रकरणाला राजकीय वळण

या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या, “हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, हा पूर्णपणे महिलांचा विषय आहे. एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फुटली होती. तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या ट्रस्टवर असल्यामुळे पोलीस कारवाई होत नव्हती का? ५८ व्हिडिओ सापडले आहेत, म्हणजे किमान ५८ महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे.”

रूपाली ठोंबरे यांचे इशारे

रूपाली पाटील ठोंबरे पुढे म्हणाल्या, “सर्व संबंधित ट्रस्टवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. मी हा विषय सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.”

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय एका महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. अशोक खरात हे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाले असून, गेल्या काही वर्षांपासून ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते.

पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल ५८ व्हिडीओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकापेक्षा अधिक महिलांवर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!