AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gudi Padwa 2026 | उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार? पंचांगकर्ते सोमण काय म्हणाले?

Gudi Padwa 2026 | उद्या गुढीपाडवा… पण नववर्ष कधी सुरू होणार? पंचांगकर्ते सोमण काय म्हणाले?

| Updated on: Mar 18, 2026 | 4:36 PM
Share

येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी सकाळी 6-53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री.सोमण म्हणाले की या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सूर्योदयाला नसल्याने 'क्षयतिथी' आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 6-53 वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर नवीन वर्ष शालिवाहन शक 1948 पराभवनाम संवत्सर सुरू होत आहे.

येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी सकाळी 6-53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री.सोमण म्हणाले की या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सूर्योदयाला नसल्याने ‘क्षयतिथी’ आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 6-53 वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर नवीन वर्ष शालिवाहन शक 1948 पराभवनाम संवत्सर सुरू होत आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. संवत्सराचे नाव पराभव आहे. या नूतन वर्षात अनीतीने,असत्याने, दुष्टपणाने, स्वार्थीपणाने, भ्रष्टाचारीवृत्तीने वागणाऱ्यांचा पराभव होणार आहे असा या नावाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. संवत्सरांची एकूण 60 नावे असून ती क्रमाक्रमाने येत असतात. यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आल्याने अमावास्या तिथी समाप्तीनंतर गढीपाडवा सण आला होता. आता यावर्षानंतर 10 एप्रिल 2032 रोजी अशी स्थिती येणार आहे असे दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

Published on: Mar 18, 2026 04:36 PM
Follow Us