AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha: राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव निश्चित? भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाचं नाव सर्वात पुढे, मोठी अपडेट समोर , या नेत्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ

Rajya Sabha Election: अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित मानल्या जात आहे. तर भाजप आणि शिंदे शिवसेनेकडूनही काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयीची मोठी अपडेट समोर येत आहे. या नेत्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार आहे.

Rajya Sabha: राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव निश्चित? भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाचं नाव सर्वात पुढे, मोठी अपडेट समोर , या नेत्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ
राज्यसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पार्थ पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 24, 2026 | 11:19 AM
Share

Rajya Sabha Election: अजितदादांच्या निधनानंतर, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रिक्त जागी पार्थ पवार यांचं नाव सुनिश्चित मानल्या जात होतं. आता हाती आलेल्या माहितीनुसार पार्थ पवार हे खासदार होतील. तर भाजप आणि शिंदे शिवसेनेकडूनही उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू होती. ही नावही निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील काहींना पुन्हा खासदारकी मिळणार असल्याचे समोर येत आहे. राज्यसभेसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. पण सध्या ही नावं सर्वात आघाडीवर असल्याचे समजते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव पुढे येत आहे. लवकरच याविषयीची माहिती समोर येईल.

पार्थ पवार असणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार

सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागी पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. तसचं २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारी विषयी या बैठकीत चर्चा झाली. वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६ तारखेला होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

भाजपकडून निष्ठावंतांची फिल्डिंग

राज्यसभेसाठी भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत.भाजपमध्ये राज्यसभेसाठी आयात केलेल्या उमेदवारांना संधी देऊ नका अशी ओरड होत होती. त्यासाठी निष्ठावंतांनी त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षात पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची संख्या मोठी वाढली आहे. त्यात अनेक बडी नावं सुद्धा आहेत. बाहेरून आलेल्यांना लागलीच मोठी पदं देण्यात आल्याने निष्ठावंत नाराज आहेत. त्यामुळे भाजपमध्ये राज्यसभेची खासदारकी कुणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे.

भाजप-शिंदे सेनेकडून कुणाचं नाव समोर?

भाजपकडून रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोतर्ब झाले आहे. तर उर्वरीत तीन जागांसाठी कुणाचं नाव समोर येतं याविषयी चर्चा रंगली आहे. एक जागा रिपाई गटासाठी सोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित मानल्या जात आहे. तसेच शिंदे गटाकडून शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे. आता अखेरच्या टप्प्यात कुणाला राज्यसभेची लॉटरी लागणार याविषयीची चर्चा रंगली आहे.

राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम

राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन

5 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज स्वीकार

6 मार्च रोजी अर्ज छाननी

9 मार्च रोजीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत

16 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान

16 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणीला सुरुवात

20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...