MVA PC | विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध, सत्ताधारी पक्षावर टीका
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री विजय वडेट्टीवार, उबाठा गटाचे खासदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंटी पाटील, उबाठा गटाचे माजी मंत्री अनिल परब, काँग्रेस नेते अमीन पटेल आणि उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव हे उपस्थित आहेत.
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री विजय वडेट्टीवार, उबाठा गटाचे खासदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंटी पाटील, उबाठा गटाचे माजी मंत्री अनिल परब, काँग्रेस नेते अमीन पटेल आणि उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव हे उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, सर्वांना वैयक्तिक निमंत्रण स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चहापानासाठी पत्र आलं आहे. मात्र आम्ही त्यांच्या चहापानाला जाणार नाही, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, ही नेहमीची प्रथा आहे, असं जरी वाटत असेल तरी तसं काहीच नाही. भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षाच्या वर्तनावरही टीका केली. त्यांनी म्हटले की, मुळात सत्ताधारी पक्षाने सभ्यतेच्या चौकटीत राहून लोकशाहीचा सन्मान करणे आवश्यक आहे, परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्ष आता मस्तीमध्ये आहे. यावेळी विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on: Feb 22, 2026 02:57 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

