MVA | ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय? संजय राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय का? या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना 'नो कमेंट' असं उत्तर दिलं. तर ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का? या प्रश्नावर बोलणं देखील संजय राऊतांनी टाळलं आहे. मात्र, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी यावर टीका केली.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय का? या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. तर ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का? या प्रश्नावर बोलणं देखील संजय राऊतांनी टाळलं आहे. मात्र, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी यावर टीका केली. शिरसाठ म्हणाले की, राऊतांना भविष्यातील काही गोष्टी समजायला लागल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला दिलेली वागणूक, मनसेने त्यांच्या पक्षासाठी घेतलेली भूमिका आणि इतर भेटीगाठी यामुळे उबाठा गटाचे लोक अस्वस्थ आहेत. शिरसाठ यांच्या मते, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांची युती आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राऊतांचे “नो कमेंट” हे वक्तव्य युतीच्या भविष्यासंदर्भात गोंधळ निर्माण करणारे ठरत आहे.
Published on: Feb 22, 2026 02:09 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

