AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडू नका

Sanjay Raut | चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडू नका

| Updated on: Feb 22, 2026 | 1:29 PM
Share

चंद्रपूरमधील महापौर पदावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं, कि शिवसेना ठाकरे गटामुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी चंद्रपूर प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत विचारले.

चंद्रपूरमधील महापौर पदावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं, कि शिवसेना ठाकरे गटामुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी चंद्रपूर प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत विचारले की, चार दिवसांपूर्वी चंद्रपूरमधील दोन्ही गटांना दिल्लीत का बोलावण्यात आले होते? तसेच काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार आणि काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीत बोलावून समज का देण्यात आली, असा सवालही त्यांनी केला. राऊत यांनी म्हटले की, याच घडामोडींमुळे चंद्रपूरमधील महापौरपद काँग्रेसच्या हातातून गेले. त्यामुळे या प्रकरणाचे संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Feb 22, 2026 01:29 PM