AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर आम्ही निर्णय घेऊ; संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut | शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर आम्ही निर्णय घेऊ; संजय राऊत स्पष्टच बोलले

| Updated on: Feb 22, 2026 | 12:47 PM
Share

राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्यास त्याबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.

राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्यास त्याबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. या विषयावर सामूहिक चर्चा होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच, महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा पहिला हक्क असल्याचे आधी मान्य केले पाहिजे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभेच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून, अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

Published on: Feb 22, 2026 12:47 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या