Sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट, हॉटेल व्यवसाय प्रचंड अडचणीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे घरगुती वापरासाठी लाकूड मिळवणंही कठीण झाले आहे. स्थानिक लाकूड गिरण्या सांगतात की, जळाऊ लाकूड पूर्णपणे संपलेले असून ग्राहक मोठ्या संख्येने लाकूड घेण्यासाठी येत आहेत. सिलेंडरच्या कमतरतेमुळे आणि २१ दिवसांच्या गॅपमुळे लोकांमध्ये पॅनिकची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे अनेकजण लाकूड पूर्णपणे खरेदी करून घेऊन गेले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे घरगुती वापरासाठी लाकूड मिळवणंही कठीण झाले आहे. स्थानिक लाकूड गिरण्या सांगतात की, जळाऊ लाकूड पूर्णपणे संपलेले असून ग्राहक मोठ्या संख्येने लाकूड घेण्यासाठी येत आहेत. सिलेंडरच्या कमतरतेमुळे आणि २१ दिवसांच्या गॅपमुळे लोकांमध्ये पॅनिकची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे अनेकजण लाकूड पूर्णपणे खरेदी करून घेऊन गेले आहेत. या परिस्थितीत रेट वाढवूनही लोकांनी लाकूड खरेदी करणे सुरू ठेवले, अशी माहिती लाकूड गिरणी मालकांनी दिली आहे. जिल्ह्यातील ही परिस्थिती स्थानिक प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली असून, गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत लवकरच उपाययोजना करण्याची गरज आहे.
Published on: Mar 18, 2026 03:44 PM
Follow Us
Latest Videos

