AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 11:09 PM
Share

Maharashtra News LIVE Updates: बारावीचा फिजिक्स, केमिस्ट्रीनंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याने खळबळ उडाली. तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणात तपास सुरू असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले.

Maharashtra News LIVE : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आपल्याला अद्याप कोणताही मदत मिळाली नसल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. तर रोहित पवारांना गुन्हा दाखल करायचा नाही तर स्टंट करायचा असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. दादांच्या अपघाताला सरकार हलक्यात घेत असल्याचा आरोप काल संजय राऊत यांनी केला होता. दादांचा विमान अपघात की घातपात यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे समोर येत आहे. तर अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल येत्या 28 फेब्रुवारीपूर्वीच येणार असल्याचे समजते.सुनेत्रा पवार यांची काल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बारावीचा फिजिक्स, केमिस्ट्रीनंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याने खळबळ उडाली. तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. तर अवकाळी पावसाने मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान केलं. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Feb 2026 05:54 PM (IST)

    नवी मुंबई : उच्चशिक्षित महिलांना फसवणाऱ्या भामट्याला अटक

    नवी मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मेट्रोमोनीयल साईटवर स्वतःला Indian Space Research Organisation म्हणजेच(ISRO)चा सायंटिस्ट असल्याचे सांगत उच्चशिक्षित महिलांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्वप्निल वारूळे या बनावट नावाने Shaadi.com वर प्रोफाईल तयार करून आरोपी महिलांशी ओळख वाढवत असे. लग्नाचे आमिष, उच्चभ्रू जीवनशैलीचा दिखावा, आणि बनावट ओळखपत्रांच्या जोरावर विश्वास संपादन करत असे आणि मग लाखोंची फसवणूक करणाऱ्या स्वप्निल वारूळेला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 27 Feb 2026 05:40 PM (IST)

    बीड- उच्च न्यायालयाचे बीडमध्ये खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी वकिलांचा मोर्चा

    बीड येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे या मागणीसाठी जिल्हा न्यायालयातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाले आहेत. बीड जिल्ह्यातून दाखल होत असलेल्या विविध प्रकरणांची संख्या पाहता न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून बीडमध्ये खंडपीठ सहकार न्यायालय व कामगार न्यायालय स्थापन करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

  • 27 Feb 2026 05:25 PM (IST)

    जालना : मका पिकाचं बियाणं बोगस निघाल्याने शेतकरी संतप्त

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील शेतकरी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं. बायर कंपनीने दिलेलं मकाच बियाणं बोगस निघाल्यामुळे मकाच्या कणसाला दाने न आल्याने या शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचं नुकसान झाले. त्यामुळे संतप्त झालेले हे शेतकरी आज मक्याचे कणीस घेऊन कंपनीची बोगसगिरी दाखविण्यासाठी थेट जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन झालेला संपूर्ण प्रकार सांगितला. बायर कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे नुकसान भरपाई देऊन बायर कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली.

  • 27 Feb 2026 05:12 PM (IST)

    जालना : महापालिका प्रशासनाचा अतिक्रमणावर हातोडा

    जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू आहे. शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या पालिका प्रशासनाच्या ताब्यातील मालमत्ता वर अतिक्रमण केलेल्या जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या आहे. शिवाय आणखी 20 ते 25 जीर्ण झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती पालिका प्रशासन पाडणार असल्याचंही समोर आलं आहे.

  • 27 Feb 2026 04:42 PM (IST)

    अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

    बदलापूर शाळेच्या व्हॅनमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चालकाविरोधात पोस्को आणि ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आज आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी व्हॅन चालक जयेश मुने याला पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले होते.

  • 27 Feb 2026 04:15 PM (IST)

    मनसेच्या शिवाजी पार्कातील अभिजात ग्रंथमेळ्याला मोठी गर्दी

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिजात ग्रंथमेळा आयोजित केला आहे, मराठी भाषेचा अभिमान आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे अनोखे भव्य पुस्तक प्रदर्शन भरलं असून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे १०० + स्टॉल्स असल्याने पुस्तकप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

  • 27 Feb 2026 04:03 PM (IST)

    मनसेकडून दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिजात ग्रंथमेळा

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिजात ग्रंथमेळा

    मराठी भाषेचा अभिमान आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखं भव्य पुस्तक प्रदर्शन

    दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे लावले १०० पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल्स

    पुस्तकप्रेमींची मोठी गर्दी

  • 27 Feb 2026 03:54 PM (IST)

    परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गबाधीत शेतकरी आणि प्रशासनाची बैठक सुरू

    परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गबाधीत  शेतकरी आणि प्रशासनाची बैठक सुरू

    जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक

    पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी देखील उपस्थित

    खासदार संजय जाधव यांच्यासह भाकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेत्यांची देखील बैठकीला उपस्थिती

    बागायतदार शेतकऱ्यांचा परभणी जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग  नेण्यास विरोध

    जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू

  • 27 Feb 2026 03:30 PM (IST)

    नाशिकमध्ये ४ थे विश्व मराठी साहित्य संमेलन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    नाशिकमध्ये ४ थे विश्व मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    विश्व मराठी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे राहणार उपस्थित

    विश्व मराठी साहित्य संमेलनात भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण तर श्रीनिवास कुलकर्णी यांना वि दा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार

    थोड्याच वेळात होईल मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांचे होणार आगमन

  • 27 Feb 2026 03:14 PM (IST)

    महिलेची छेड काढल्याचा आरोप, नायजेरियन तरुणांना जमावाने चोपलं

    छत्रपती संभाजीनगर येथे  एमजीएम हॉस्पिटल रोड लगत दोन परदेशी नायजेरियन युवकानी एका महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर जमावाने या तरुणांना पकडून चांगलाच चोप दिला. या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून, अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये.

  • 27 Feb 2026 02:55 PM (IST)

    पुण्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक

    पुण्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक. गुंड दत्तात्रय लाखे मोक्का प्रकरणातील आरोपी. निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करतायत.

  • 27 Feb 2026 02:45 PM (IST)

    साताऱ्याच्या वडूजमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

    सातारा: वडूज येथील मेघा विनायक पवार या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान या विवाहितेला आत्म्यहत्या करण्यास प्रवृत केल्या प्रकरणी पती विनायक पवार,दीर आणि सासरे यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

  • 27 Feb 2026 02:35 PM (IST)

    करमाळ्यात मुलगी देत नाही म्हणून भाच्याकडून मामाला मारहाण

    करमाळा तालुक्यातील उमरड येथे लग्नासाठी मुलगी देत नसल्याने भाच्याकडून मामाला मारहाण करण्यात आली असून मुलीचा भाच्याबरोबर लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून दगड आणि लाथा बुक्क्यांने केलेल्या मारहाणीत मुलीचे वडील (मामा) गंभीर जखमी झाले. याप्रकरणी करमाळयाच्या पोलिसांनी जखमीची बहीण तिची दोन मुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी आपल्या मुलीचा विवाह बहिणीच्या मुलासोबत करण्यास नकार दिला. त्याचा राग धरून वरील तिघांनी त्यांना मारहाण करून जखमी केले अशी नोंद पोलिसात झाली आहे .हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत.

  • 27 Feb 2026 02:25 PM (IST)

    दिल्लीतील केजरीवालांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

    दिल्लीतील केजरीवालांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. केजरीवालांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. ढोल-ताशांच्या गजरात कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत

  • 27 Feb 2026 02:17 PM (IST)

    रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे- मुंडे

    रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे… धनंजय मुंडेंची टीका… तर विलीनीकरणाची चर्चा करताना घाई नव्हती का झाली?… सत्तेत आहात तर किमान FIRसाठी तरी मदत करा, रोहित पवारांचा पलटवार

  • 27 Feb 2026 01:56 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 8 हजारांची वाढ झाली.  सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 770 रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 27 Feb 2026 01:50 PM (IST)

    यात काही काळंबेरं आहे का हा संशय येत आहे – राज ठाकरे

    यात काही काळंबेरं आहे का हा संशय येतोय. सरकारच संशय निर्माण करत आहे.  कुटुंबाला काही वाटत असेल आणि चौकशी व्हावी वाटत असेल तर त्यात गैर काय. याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.

  • 27 Feb 2026 01:45 PM (IST)

    रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

    रोहित पवारांनी 3 ठिकाणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला.  मात्र एफआयआर दाखल करून  घेतला नाही. सरकार अडथळे का आणत आहे – मनसे धअयक्ष राज ठाकरे यांचा सवाल

  • 27 Feb 2026 01:41 PM (IST)

    मिरा-भाईंदर पोलीस भरतीतील नियोजनाचा पुरता फज्जा

    उद्याचे रक्षक आज रस्त्यावर, मिरा-भाईंदर पोलीस भरतीतील नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे.  हजारो उमेदवार उघड्यावर झोपले, प्रशासकीय उदासीनतेमुळे तीव्र संताप उमटला.

    सरकार लाखो रुपये खर्च जाहिरातीवर करते आहे, पण पोलीस भरतीला आलेल्या जवानांना राहण्याची व्यवस्था करायला पैसे नाहीत असा आरोप काँग्रेस प्रवक्ता सिद्देश राणे यांनी केला.

  • 27 Feb 2026 01:28 PM (IST)

    देवगिरी बंगल्यावर अजित दादाचं स्मारक असावं – रोहित पवार

    मुख्यमंत्र्यांशी 20 मिनिटं डिटेल चर्चा केली. अनेक मागण्या त्यांच्यासमोर केल्या, विनंती केली. देवगिरी बंगल्यावर अजित दादाचं स्मारक असावं. बारामती विमानतळाचं नाव दादांच्या नावाने करावं अशी विनंती केली – रोहित पवार

  • 27 Feb 2026 01:23 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं, रोहित पवारांनी सगळंच सांगितल

    अजित दादांच्या अपघाती मृत्यूबद्दल मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली. अपघाताबात ज्या शंका मनात होत्या, त्या सर्व मी फडणवीसांसमोर बोलून दाखवल्या. सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली

  • 27 Feb 2026 01:19 PM (IST)

    रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार विधानभवनातील दालनात फडणवीस यांना भेटले, त्यांच्यात 10 मिनिटं चर्चा झाली.

  • 27 Feb 2026 01:08 PM (IST)

    जळगाव – महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

    जळगावात महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे.  जळगाव शहरातील आयटीआयजवळील कचरा कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.  आयटीआय जवळ होणाऱ्या कचरा डेपोच्या समस्येमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांच्या आंदोलनात भाजपचे विद्यमान नगरसेवक सहभागी झाल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

  • 27 Feb 2026 12:54 PM (IST)

    पाटणादेवी येथील प्राचीन महादेव मंदिराचे विद्रूपीकरण,सहा जणांविरुद्ध गुन्हा

    जळगावच्या चाळीसगावत रीलसाठी पाटणादेवी येथील प्राचीन महादेव मंदिराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल. संरक्षित राष्ट्रीय स्मारक असलेल्या पाटणादेवी येथील पुरातत्व महादेव मंदिरात ज्वलनशील पदार्थ वापरून मशाली पेटवल्याचा आरोप. इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकार उघड. भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल.

  • 27 Feb 2026 12:22 PM (IST)

    काकींचं भाषण मी ऐकलं, त्यांनी संदेश चांगला दिला – सुनेत्रा पवार

    “काकींचं भाषण मी ऐकलं. त्यांनी संदेश चांगला दिला. इतरांचं भाषण मी ऐकलं नाही. सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत. पवार कुटुंबाच्या एक घटक आहेत. पत्रकार परिषदेला सामोरं जाऊ शकतात. कोणाला वाटत असेल काकींना कंट्रोल करु शकतो तर ते भ्रमात आहेत” असं रोहित पवार म्हणाले.

  • 27 Feb 2026 12:18 PM (IST)

    थातुर-मातुर रिपोर्ट नको, जनता सोडणार नाही – रोहित पवार

    एक महिना तुमच्या हातात होता. मी सोमवारी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार. या घटनेत काय-काय घडलय ते सिद्ध करणार आहे. उद्या येणारा रिपोर्ट थातुर-मातुर दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही. रिपोर्ट द्यायचा असेल तर योग्य द्या असं रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

  • 27 Feb 2026 12:16 PM (IST)

    मी दादांसोबत असणार आहे, राज ठाकरे म्हणाले

    मी स्टंट करतो. तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू दे. एफआयआर करु देण्यासाठी मदत करा ना. मराठी माणसासाठी राज ठाकरे लढत आलेले आहेत. त्यांनी मला विचारायचं कारण नाही असं सांगितलं. मी दादांसोबत असणार आहे असं राज ठाकरे मला म्हणाले असं रोहित पवार म्हणाले.

  • 27 Feb 2026 12:13 PM (IST)

    रोहित पवारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली

    रोहित पवारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. विमान अपघाताची राज ठाकरेंनी सर्व माहिती समजून घेतली. FIR घ्यावाचा लागतो राज ठाकरेंनी मला दोन दाखले दिले असं रोहित पवार म्हणाले.

  • 27 Feb 2026 12:07 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये यासाठी गेवराई शहरात निघाला मोर्चा

    बीडच्या गेवराई शहरात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रात्रीत शिवप्रेमींनी पुतळा उभारला होता. यानंतर विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी 25 जणांवर गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर प्रशासनाकडून पुतळा हटवला जाणार असल्याची चर्चा असल्याने रात्री हजारोंचा मोर्चा निघाला होता तर आता गेवराई शहरात शिवप्रेमींकडून मोर्चा काढण्यात आला आहे.

  • 27 Feb 2026 12:00 PM (IST)

    शिवरायांनी आपल्याला स्वतःच्या भाषेता अभिमान शिकवला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    छत्रपती शिवरायांनी प्रमाण भाषा काय आहे हे आपल्याला सांगितलं. त्यामुळे भाषेचा जो आपला अभिमान आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्याठिकाणी सुरु होतो. आपल्या भाषेची यात्रा ज्ञानोबा, तुकोबांच्या प्रवासातून आपल्याला पाहायला मिळते…. असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे.

  • 27 Feb 2026 11:55 AM (IST)

    अजित पवार अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल!

    अजित पवार अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल जाहिर होणार आहे.  अजित पवार अपघातप्रकरणी प्राथमिक अहवाल सायंकाळी 7 पर्यंत जाहिर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून Directorate General of Civil Aviation (DGCA) कडे अहवाल सुपूर्द होणार. दोन दिवसांपूर्वी VSR कंपनीच्या विमानांवर प्रश्न; पाच विमानांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अपघाताच्या कारणांवरून मोठा खुलासा शक्य; राजकीय वर्तुळाचे अहवालाकडे लक्ष  लागले आहे.

  • 27 Feb 2026 11:40 AM (IST)

    मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी

    मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांनी  दांडी मारली आहे.  सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले. विधीमंडळातील ९० टक्क्यांहून अधिक आमदार कार्यक्रमासाठी अनुपस्थितीत होते.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्री मात्र उपस्थित होते. आमदारांची मात्र अनास्था…

  • 27 Feb 2026 11:30 AM (IST)

    अभिनेता डायरेक्टर महेश मांजरेकर राज ठाकरे यांच्या भेटीला

    अभिनेता डायरेक्टर महेश मांजरेकर राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.  राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या ठिकाणी  भेटीला आले.  काही वेळापूर्वीच रोहित पवार देखील राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर दाखल झाले.

  • 27 Feb 2026 11:13 AM (IST)

    खोटी केस होती सत्याचा विजय झाला – अरविंद केजरीवाल

    खोटी केस होती सत्याचा विजय झाला… देशासोबत अशाप्रकारे खेळू नका… असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

  • 27 Feb 2026 11:00 AM (IST)

    रोहित पवार राज ठाकरेंच्या भेटीला, अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात चर्चा करणार

    रोहित पवार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी ते अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ते शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंशी चर्चा करत आहेत.

  • 27 Feb 2026 10:54 AM (IST)

    भंडारा–गोंदिया बाळ विक्रीप्रकरणी 10 सदस्यीय एसआयटी स्थापन

    भंडारा–गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू झाली आहे. याप्रकरणी एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. हे पथक संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करणार असून संबंधितांची कसून चौकशी, पुरावे संकलन आणि दोषींवर कठोर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 27 Feb 2026 10:44 AM (IST)

    विधीमंडळ सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

    विधीमंडळ सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती राम शिंदे हे नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 27 Feb 2026 10:34 AM (IST)

    राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन रविंद्र चव्हाण दिल्लीला रवाना

    भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन रविंद्र चव्हाण हे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून राज्यसभेच्या चार जागांसाठी २४ जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. आता दिल्लीतील वरिष्ठ नेते या २४ नावांमधून ४ नावे फायनल करणार आहेत.

  • 27 Feb 2026 10:27 AM (IST)

    अजित दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता

    अजित दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमान अपघातप्रकरणी DGCA आज प्राथमिक अहवाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 27 Feb 2026 10:15 AM (IST)

    मराठी शाळा बंद का पडतात, संजय राऊतांचा सवाल

    महाराष्ट्रात हिंदीसक्ती करु नये. त्रिभाषा सूत्रीसाठी केंद्रातून दबाव टाकला जातो. सरकारी कागद काहीही म्हणो, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विधीमंडळात कागद कसले दखावता, मराठी शाळा बंद का पडतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित आहे.

  • 27 Feb 2026 10:11 AM (IST)

    आशा सेविकांना आरोग्य सेविकेकडून मारहाण, आशा सेविकांचा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

    जळगावच्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे आशा सेविकांना आरोग्यसेविकेकडून मारहाण झाल्याचा आरोप आशासेविकांना केला आहे. आम्हाला बैठकीला बोलवून आरोग्य सेविकांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप आशा सेविकांनी केला आहे. यानंतर आशासेविकांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून मारहाण करणाऱ्या आरोग्य सेविकेचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी केली आहे. आशासेविकांकडून आरोग्य सेविका पैसे मागत असून पैसे न दिल्याच्या कारणांनी ही मारहाण झाल्याचा आरोप आशा सेविकांनी केला आहे.

  • 27 Feb 2026 10:06 AM (IST)

    शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, बदलापुरातील धक्कादायक घटना

    बदलापूर पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी बस चालकाविरोधात पोस्को आणि ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 27 Feb 2026 09:50 AM (IST)

    मिठी नदीच्या विकासासाठी २८६ कोटींची तरतूद

    ​मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी २८६.२५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून नदीचे रुंदीकरण, प्रदूषण नियंत्रण आणि गाळ उपशाची कामे केली जाणार आहेत. ​गाळ उपशासाठी नवा आराखडा: यावर्षी गाळ काढण्यासाठी ३८ कोटी रुपये खर्च होणार असून, जुन्या कंत्राटदारांमधील वादानंतर आता नव्याने निविदा काढल्या जाणार आहेत.

  • 27 Feb 2026 09:40 AM (IST)

    मालाड रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपड्यांवर चालणार हातोडा

    मालाडमधील रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या अनधिकृत झोपड्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या झोपड्या हटवण्यास पश्चिम रेल्वेला हिरवा कंदील दिला आहे. ​रेल्वेला परवानगी: मुंबई सेंट्रल-बोरीवली या ६ व्या लोहमार्गालगतच्या बेकायदा झोपड्या हटवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

  • 27 Feb 2026 09:30 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

    नाशिक मध्ये आयोजित विश्व मराठी संमेलनाला लावणार उपस्थिती. कालपासून विश्व मराठी संमेलनाला झाली आहे सुरुवात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज कार्यक्रमांना हजेरी लावणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज निघणार दिंडी. नाशिक मध्ये आज कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. सकाळपासूनच कार्यक्रमांना होणार सुरुवात

  • 27 Feb 2026 09:20 AM (IST)

    आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस

    आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंधेरी सबवे बाबत लक्षवेधी उपस्थित केली जाणार आहे. शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मुर्जी भाई पटेल लक्षवेधी मांडतील. अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्वसाठी जोडला जाणारा एकच सबवे असून पावसाळ्याच्या काळात पाणी साचल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास होतो. प्रत्येक अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन मार्ग काढण्यात येईल असा आश्वासित केलं जातं पण तरी देखील काहीच हालचाली होत नाहीत

  • 27 Feb 2026 09:06 AM (IST)

    राजूर ते अहिल्यानगर लाँग मार्चचा आज चौथा दिवस

    संगमनेर तालुक्यातील निझर्णेष्वर देवस्थान येथे आंदोलकांचा मुक्काम. आंदोलनाच्या तोडग्यासाठी शासकीय हालचालींना वेग. शिष्टमंडळ आणि प्रशासनामध्ये महत्त्वाची बैठक अपेक्षित. चर्चेनंतरच पुढील दिशा ठरणार. तोडगा न निघाल्यास लोणी येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या गावाकडे मोर्चा. लाल वादळ लोणीकडे धडकणार का ? सर्वांचे लक्ष चर्चेकडे….

  • 27 Feb 2026 09:00 AM (IST)

    मुंबई व उपनगराची हवेची गुणवत्ता वाढली

    गेले दोन दिवसा पूर्वी 172 वर असलेला मुंबईचा AQI थेट शंभराच्या आसपास आहे. तर उपनगरांमध्ये 100 च्या आत नोंद झाली आहे. मुंबई व आसपासच्या शहरात तर प्रदूषण कमी होताच दादर चौपाटी परिसरात मोठा फरक; आकाशात ढग स्पष्ट दिसू लागले. 24 तारखेला मुंबई व उपनगरात 172 AQI असलेला निर्देशांक आज भायखळा आणि दादर परिसरात 90 ते 120 दरम्यान तर उपनगरात 50 ते 100 AQI ‘मध्यम’ श्रेणीत आहे. आरोग्यावरील धोका तुलनेने कमी झाला आहे.

  • 27 Feb 2026 08:50 AM (IST)

    नाशिकमध्ये उकाड्यापासून दिलासा

    रात्रीच्या उकाड्या पासून नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात वातावरणात सातत्याने बदल आहे.कमान आणि किमान तापमानांमध्ये दोन दिवसात मोठा फरक दिसत आहे. किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअस आहे. सायंकाळच्या सुमारास पुन्हा गारवा निर्माण झाल्याने वातावरणात बदल दिसत आहे. पुढचे काही दिवस वातावरण असेच बदलेल अशी शक्यता आहे.

  • 27 Feb 2026 08:40 AM (IST)

    आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस

    आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंधेरी सबवे बाबत लक्षवेधी उपस्थित केली जाणार आहे. शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मुर्जी भाई पटेल लक्षवेधी मांडतील.अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्वसाठी जोडला जाणारा एकच सबवे असून पावसाळ्याच्या काळात पाणी साचल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास होतो. प्रत्येक अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन मार्ग काढण्यात येईल असा आश्वासित केलं जातं पण तरी देखील काहीच हालचाली होत नाहीत. आजच्या होणाऱ्या अंधेरी सबवे लक्षवेधी वर काही कायमस्वरूपी तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे.

  • 27 Feb 2026 08:30 AM (IST)

    नमस्कार नाशिककर

    कुसुमाग्रज जयंती निमित्त आजपासून महापौरांचे नमस्कार नाशिककर हे अभियान कौतुकाचा विषय ठरत आहे. प्रत्येक महिन्याला महापौर नाशिककरांना पत्र लिहिणार आहे. पत्रामध्ये शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा देणार आहेत.नाशिककरांच्या सूचना देखील मागवून घेणार आहे. नाशिककरांची संवाद साधण्यासाठी महापौरांचा नवा उपक्रम कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आजपासून सुरू होत आहे.

  • 27 Feb 2026 08:20 AM (IST)

    तर छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणी मिळेल

    कंत्राटदारांनी प्रयत्न केल्यास पुढील २ आठवड्यात जॅकवेलमधून २०० एमएलडी पाणी उपसा सुरू होऊ शकतो. त्यापैकी १७६ एमएलडी पाणी महापालिकेला मिळेल. त्यातून ८० टक्के शहराला २ दिवसांआड पाणी पुरवठा करता येईल, असे निवेदन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी केले.

  • 27 Feb 2026 08:10 AM (IST)

    परभणी शक्ती हे ज्वारी बियाणे निघाले निकृष्ट

    पुण्याच्या भोर तालुक्यात महाबीजच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकरी गटांना देण्यात आलेले परभणी शक्ती हे ज्वारी बियाणे निकृष्ट निघाले. पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच न झाल्याने ज्वारी तर नाहीच शिवाय गुरांच्या चाऱ्यासाठीचा कडबा देखील उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या निकृष्ट बियाणांमुळे अख्खा रब्बी हंगामचं वाया गेल्यानं शेतकऱ्यांना एकरी 45 ते 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे..

  • 27 Feb 2026 08:05 AM (IST)

    मालाड रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपड्यांवर चालणार हातोडा! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    मालाडमधील रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या अनधिकृत झोपड्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या झोपड्या हटवण्यास पश्चिम रेल्वेला हिरवा कंदील दिला आहे. मुंबई सेंट्रल-बोरीवली या ६ व्या लोहमार्गालगतच्या बेकायदा झोपड्या हटवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Published On - Feb 27,2026 8:04 AM

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.