Arvind Sawant | Women’s Reservation Bill | नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
‘नारी शक्ती वंदन’ महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले असून, या मुद्द्यावर संसदेत जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर टीका केली. विरोधक या विधेयकाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘नारी शक्ती वंदन’ महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले असून, या मुद्द्यावर संसदेत जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर टीका केली. विरोधक या विधेयकाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत यांनी लोकसभेत यावर प्रत्युत्तर देताना केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर झालं आहे. त्यावेळी कोण विरोधात होतं? मग आता विरोधकांवर आरोप का?” असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना सावंत यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा उल्लेख करत, ते म्हणाले की, इथे अनेक महिला भगिनी उपस्थित आहेत, त्यांच्यासमोर सांगण्यात आलं की आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात आहोत. अध्यक्ष मोहदय आम्ही महाराष्ट्रातून येतो. हाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार केले. जिजाऊंच्या संस्कारातून स्वराज्य उभं राहिलं. त्यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतली नाही. महिलांचा अपमान झाला तर शिवाजी महाराज थेट दोषी व्यक्तीचा चौरंगा करायचे. त्याचे हात पाय तोडून टाकायचे. हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात कोणा-कोणाचा जन्म झाला, झाशीची रानी, अहिल्याबाई होळकर, तारारानी या सर्वांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. मग आम्ही महिला आरक्षणाला विरोध का करणार? असा सवाल यावेळी अरविंद सावंत यांनी केला.
Published on: Apr 16, 2026 06:43 PM
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक

