AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक यांचं तब्बल 21 दिवस दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होतं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान आता रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

मोठी बातमी! ...तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ
Sonam WangchukImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2026 | 8:55 PM
Share

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक यांचं तब्बल 21 दिवस दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होतं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान आता रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 25 वा दिवस आहे.

नेमकं काय म्हणाले सोनम वांगचूक?

‘नमस्कार मित्रांनो मी अजूनही जिवंत आहे, आज माझ्या उपोषणाचा 25 वा दिवस आहे. 25 दिवसांमध्ये माझं जवळपास 11 किलो वजन कमी झालं आहे. माझ्या पेशी आता मोठ्या संख्येनं कमी होत आहे, परंतु मी अजूनही चांगला आहे. मंगळवारी रात्री मला गुडगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी त्या सर्व विद्यांर्थ्यांचं कौतुक करतो, या विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज होत असाताना देखील खूप शांततेत आंदोलन केलं, या विद्यार्थ्यांना अनेकदा हिंसेसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला, आंदोलनस्थळी दगडफेक करण्यासठी काही लोक आणण्यात आले, परंतु तरी देखील या विद्यार्थ्यांनी आपला थोडा देखील संयम ढळू दिला नाही. त्यांनी अतिशय शांततेत आंदोलन केलं.

मी खूप भावुक झालो, त्यांच्यावर खूप क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळेच मी माझं उपोष सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मला अनेक नेते भेटून गेले, त्यांनी मला उपोषण सोडण्याची विनंती केली, ज्यामध्ये मंत्र्यांचा देखील समावेश होता, खासदारांनी देखील माझी भेट घेतली, मी माझं उपोषण सोडावं आणि पुन्हा एकदा देशाच्या सेवेला सुरुवात करावी अशी विनंती त्यांनी मला केली. मला स्वत:ला देखील असंच करावं वाटतं, मला माझं काम खूप महत्त्वाचं आहे. पण मी सरकारला विनंती करतो की, पुन्हा विद्यार्थ्यांवर असा बळाचा वापर करू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नका, ज्यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो, जर मला सरकारने या दोन गोष्टींचं आश्वासन दिलं तर मी आजच माझं उपोषण मागे घेईल, परंतु जर असं आश्वासन आलं नाही तर दुर्दैवाने मला हे उपोषण सुरूच ठेवावं लागेल, असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज 

दरम्यान सोमवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर देशात चांगलंच वातावरण तापलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...