AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, MI vs PBKS: अर्शदीप सिंगची मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी, तिसऱ्या षटकात नोंदवला विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंगने कहर केला. त्याचा सामना करताना मुंबई इंडियन्सचे फलंदाज धडपडताना दिसले. या सामन्यात त्याने शतक पूर्ण केलं.

IPL 2026, MI vs PBKS: अर्शदीप सिंगची मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी, तिसऱ्या षटकात नोंदवला विक्रम
IPL 2026, MI vs PBKS: अर्शदीप सिंगची मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी, तिसऱ्या षटकात नोंदवला विक्रमImage Credit source: Punjab Kings Twitter
| Updated on: Apr 16, 2026 | 8:14 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 24वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेपेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीला वाटेला आल्याने मुंबई इंडियन्सपुढे मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान होतं. पण पावरप्लेमध्ये पंजाब किंग्सचा वरचष्मा दिसला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत आला. या सामन्यात अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना अडचणीत आणलं. पहिल्या षटकात अर्शदीप सिंगने फक्त एक धाव दिली आणि रियान रिकल्टनला गोलंदाजीत चकवा दिला. या दोघांचा तिसऱ्या षटाकत पुन्हा सामना झाला. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी रिकल्टन समोर होता. पण पहिल्याच चेंडूवर त्याने रिकल्टनला बाद केलं. षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण सीमेवर शशांक सिंगने त्याचा अप्रतिम झेल पकडला. यासह अर्शदीप सिंगने आयपीएल स्पर्धेत विकेटचं शतक पूर्ण केलं.

आयपीएल स्पर्धेत रिकल्टनची विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. पण पहिल्याच चेंडूवर त्याला चालतं केलं. त्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत आला. मागच्या 11 सामन्यातील प्रदीर्घ विश्रांतीनंतर अर्शदीप सिंगने पावरप्लेमध्ये विकेट घेतली. 21.1 षटक टाकल्यानंतर त्याला पावरप्लेमध्ये विकेट मिळाली आहे. एक नाही तर दोन विकेट काढल्या. तर डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून 100 विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. ट्रेंट बोल्टने 144. जयदेव उनाडकटने 114, आशिष नेहराने 106, झहीर खानने 102 आणि आता अर्शदीप सिंगने 101 विकेट घेतल्या आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये अर्शदीप सिंग आणि रायन रिकल्टन यांचा 7 डावात आमनासामना झाला आहे. यात रिकल्टनने अर्शदीपच्या 43 चेंडूंचा सामना केला. यात 51 धावा दिल्या आणि तीन वेळा विकेट काढली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...