AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra: प्रियंका-निकने लेक मालतीसोबत केलं कन्यापूजन; घरातील मंदिराचीही चर्चा

प्रियंका आणि निक आपल्या मुलीला भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करताना अनेकदा दिसले आहेत. मालतीसोबतचे हे फोटोही त्याचाच एक भाग आहेत. कामानिमित्त जगभर फिरणाऱ्या या जोडप्याने सणाच्या निमित्ताने कुटुंबासोबत घालवलेले हे खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

| Updated on: Oct 21, 2026 | 4:06 PM
Share
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा परदेशात राहत असली, तरी भारतीय संस्कृती आणि परंपरांशी तिचं नातं आजही घट्ट आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्ताने प्रियंकाने पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत खास पूजा केली.

1 / 8
या सोहळ्याचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये मालतीचा निरागस अंदाज, प्रियंका-निकचा पारंपरिक लूक आणि त्यांच्या घरातील सुंदर मंदिराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 8
प्रियंकाने अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथल्या आपल्या घरी महानवमी आणि दसऱ्यानिमित्त धार्मिक विधी केले. यावेळी तिने पती निक आणि मुलगी मालतीसोबत पूजेत सहभाग घेतला. या सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे कन्यापूजनाचा विधी. या परंपरेत लहान मुलींना देवी दुर्गेचं स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते.

3 / 8
शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक चांदीच्या ताटात मालतीचे पाय धुताना दिसतो, तर प्रियंकाही लेकीच्या चरणांना स्पर्श करताना दिसते. या खास क्षणांमधून कुटुंबाची श्रद्धा आणि भारतीय परंपरांबद्दलचा आदर दिसून येतो.

4 / 8
परदेशात राहूनही आपल्या मुलीला भारतीय संस्कारांची ओळख करून देण्याचा प्रियंकाचा प्रयत्न चाहत्यांना आवडला आहे. या पूजेच्या वेळी मालतीने पांढऱ्या रंगाचा सुंदर पारंपरिक पोशाख परिधान केला होता. तिच्या गळ्यात ‘जय माता दी’ असलेली लाल रंगाची चुनरी आणि हातात छोट्या बांगड्या दिसत होत्या.

5 / 8
प्रियंका आणि निकच्या घरातील मंदिराची झलकही या फोटोंमध्ये पाहायला मिळाली. पांढऱ्या संगमरवरी दगडात तयार केलेल्या या मंदिरात भगवान शंकराची भव्य मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे गुलाबी बोगनवेलच्या फुलांची सजावट करण्यात आली असून, आजूबाजूला सोनेरी स्टँडवर मेणबत्त्या ठेवल्या आहेत.

6 / 8
या सजावटीमुळे मंदिराला साधेपणासोबतच भव्य रूप मिळालं आहे. प्रियंकाने परदेशात स्वतःचं घर थाटलं असलं, तरी भारतीय सण आणि धार्मिक परंपरांना आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाचं स्थान दिल्याचं या फोटोंमधून दिसतं.

7 / 8
पूजेचे फोटो शेअर करताना प्रियंकाने देवी दुर्गेची शक्ती, प्रार्थनेची पवित्रता आणि दसऱ्याचा सकारात्मक संदेश कायम आपल्या आयुष्यात राहावा, अशी भावना व्यक्त केली. तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

8 / 8
Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र