आयपीएल 2024
आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. आयपीएल स्पर्धेचं 16 पर्व पार पडली असून यंदा 17वं पर्व आहे. एकूण 10 संघ सहभागी असून जेतेपदासाठी जोरदार चुरस असणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल, पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डुप्लेसिस, सनराईझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे.