आयपीएलमध्ये फक्त 170 धावा करणाऱ्या खेळाडूकडे प्रशिक्षकपद, केकेआरची स्पर्धेपूर्वी घोषणा
कोलकाता नाइट रायडर्सने मिनी लिलावात संघाची नव्याने बांधणी केली. त्यात मुस्तफिझुर रहमानला काढल्याने एका खेळाडूची तजवीज करावी लागणार आहे. असताना केकेआर संघात नव्या प्रशिक्षकाची एन्ट्री झाली आहे. कोण ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेला आता फक्त दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर लगेच आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच फ्रेचायझींनी मोर्चेबांधणी केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असलेल्या खेळाडूंना वगळून तयारी सुरू केली आहे. असं असताना कोलकाता नाइट रायडर्सने या स्पर्धेपूर्वी बहुतांश खेळाडू बदलले आहे. मिनी लिलावापूर्वी खेळाडूंना रिलीज केलं होतं आणि नव्या खेळाडूंची भरती केली. खेळाडूंची निवड झाल्यानंतर आता सपोर्ट स्टाफमध्ये बदल केला जात आहे. केकेआरला नवा फिल्डिंग कोच मिळाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. केकेआरने या पर्वासाठी सपोर्ट स्टाफमध्ये पूर्णपणे बदल केला आहे. काही दिग्गजांना सपोर्ट स्टाफमध्ये स्थान दिलं आहे.
केकेआरला मिळाला नवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2026 स्पर्धेसाठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक निवडला आहे. ही जबाबदारी दिशांत याग्निकच्या खांद्यावर दिली आहे. दिशांत याग्निक माजी विकेटकीपर फलंदाज आहे. त्याने राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलं असून त्यात चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये 2011 ते 2014 या कालावधीत 25 सामने खेळले. निवृत्तीनंतर आयपीएलच्या अनेक पर्वात क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम केलं. आता केकेआरसोबत काम करणार आहेत. केकेआरचं क्षेत्ररक्षण सुधारण्यावर त्यांचा भर असेल. यामुळे संघाला धावा रोखणं, तसेच फलंदाजांवर दबाव वाढवणं सोपं होईल.
𝙃𝙚’𝙨 𝙖 𝘾𝙖𝙩𝙘𝙝! Knights Army, welcome our new fielding coach, Dishant Yagnik! 🙌 pic.twitter.com/xuqzpMTVZ6
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 21, 2026
केकेआरने आयपीएल 2026 पर्वासाठी नव्या दमाचा स्टाफ निवडला आहे. जुन्या स्टाफला दूर सारून नव्याने बांधमी केली आहे. संघाच्या हेड कोचची जबाबदारी अभिषेक नायरकडे आहे. तर ड्वेन ब्रावो हा मेंटॉर असणार आहे. शेन वॉटसन असिस्टेंट कोच म्हणून जबाबदारी सांभाळेल. टिम साउथी गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडेल. आंद्रे रसेल पॉवर कोच म्हणून काम करेल. आता या स्टाफमध्ये दिशांत याग्निकची एंट्री झाली आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली केकेआरचा संघ क्षेत्ररक्षणात काय कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
