AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Final: हार्दिक पांड्याने माहिका पत्नी असल्याचं केलं जाहीर, मैदानात KISS केलं

Hardik Pandya- Mahieka Sharma: भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयानंतर खेळाडूंच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. प्रत्येक खेळाडू आनंदाच्या भरात मनातला भावना व्यक्त करत होता. हार्दिक पांड्यानेही माहिका शर्माबाबत जाहीरपणे सांगितलं.

T20 World Cup 2026 Final: हार्दिक पांड्याने माहिका पत्नी असल्याचं केलं जाहीर, मैदानात KISS केलं
T20 World Cup 2026 Final: हार्दिक पांड्याने माहिका पत्नी असल्याचं केलं जाहीर, मैदानात KISS केलंImage Credit source: X
| Updated on: Mar 09, 2026 | 12:19 AM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या स्पर्धेचा शेवट भारताने जेतेपदाने केला. या स्पर्धेत भारताने एकमेव सामना गमावला. सुपर 8 फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. या व्यतिरिक्त एकही सामना भारताने गमावला नाही. उपांत्य आणि अंतिम फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. तर टी20 वर्ल्डकप जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. यावेळी हार्दिक पांड्यानेही मनातलं सर्व काही सांगितलं. हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मा ही पत्नी असल्याचं जाहीरपणे सांगितलं. हार्दिक पांड्याने जतिन सप्रूसोबत संवाद साधताना जाहीर कबुली दिली. हार्दिक पांड्याने असं सांगताच मैदानातील प्रेक्षकवर्ग जोरात ओरडला.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

हार्दिक पांड्या जतिन सप्रूसोबत संवाद साधताना म्हणाला की, माहिका माझ्या आयुष्यात आल्यापासून मला विजयावर विजय मिळत आहेत. ती माझ्या आयुष्यात आल्याने सर्वकाही ठीक होत आहे. हार्दिक पांड्याने तिचं कौतुक करताना जतिन सप्रूला सांगितलं की, ती माझी पत्नी आहे. असं सांगताच त्याने माहिका शर्मा जिथे उभी होती तिथे हात दाखवला. संवाद संपल्यानंतर हार्दिक पांड्या माहिकाला भेटला आणि तिची गळाभेट घेतली. त्यानंतर तिच्या गालावर चुंबन घेतलं. माहिकानेही त्याला किस केलं. हार्दिकने माहिका पत्नी असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघं भेटत होते. तेव्हा सोशल मीडियावर चर्चा रंगायच्या. पण आता पती पत्नी असल्याचं जाहीर झालं आहे.

हार्दिक पांड्याचं पुढचं लक्ष्य काय?

हार्दिक पांड्याने या स्पर्धेतील 9 सामन्यात 217 धावा केल्या. तसेच 9 विकेटही घेतल्या आहेत. त्याने टीम इंडियाच्या जेतेपदात मोलाचं योगदान दिलं आहे. हार्दिक पांड्याने अजून 10 वर्षे क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं आहे. आणखी 5-6 आयसीसी ट्रॉफी जिंकणार असल्याचं सांगितलं. हार्दिक पांड्याने सांगितलं की, टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर मी स्वत:ला सांगितलं आहे की जितक्या स्पर्धा खेळेन तितक्या जिंकणार आहे. इतकंच काय तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असल्याचं सांगितलं.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप