हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या सर्वोत्तम ऑलराउंडर्सपैकी एक आहे. हार्दिकने आतापर्यंत टीम इंडियाचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हार्दिक टीम इंडियाच्या टी 20I वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य आहे. हार्दिकने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवून दिला आहे. हार्दिक बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघांड्यावर दमदार कामगिरी करत आला आहे. त्यामुळे हार्दिक कोणत्याही कर्णधाराची पहिली पसंत राहिला आहे. हार्दिकचा सख्खा भाऊ कृणाल पंड्या यानेही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. दोघेही भाऊ देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा टीमचं प्रतिनिधित्व करतात. तसेच हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. हार्दिकने याआधी गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे.
Hardik Pandya : हार्दिक पंड्या मोठ्या विक्रमासाठी सज्ज, मुल्लानपूरमध्ये ऑलराउंडर इतिहास घडवणार!
Hardik Pandya India vs South Africa: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला दुसऱ्या टी 20i सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 11, 2025
- 5:49 pm