AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणित

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता पूर्ण झाली असून 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत क्रीडाप्रेमींचं लक्ष हे मुंबई इंडियन्स संघाकडे असेल. कारण मागच्या पाच वर्षात त्यांनी जेतेपद मिळालेलं नाही. असं असताना मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11 बाबत आकाश चोप्राने आपलं म्हणणं मांडलं आहे.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणित
IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणितImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 12, 2026 | 9:46 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. यात मुंबई इंडियन्स संघही मागे नाही. मुंबई इंडियन्स संघ कागदावर एकदम स्ट्राँग आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं ऐकली तर प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटेल. पण मुंबई इंडियन्सने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 मध्ये जिंकली होती. त्यानंतर सलग पाच वर्षे पदरी निराशा पडली आहे. आता मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. असं असताना मिनी लिलावानंतर मुंबई इंडियन्स संघ खूपच मजबूत दिसत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते हा संघ सर्वात घातक दिसत आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या बहुतांश खेळाडूंनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा फॉर्म काय आहे याचा अंदाज येतो.

हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे या संघात आहेत. त्यात रोहित शर्मा सलामीला उतरून चांगली सुरूवात देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने गेल्या काही महिन्यात आपल्या फिटनेस आणि फलंदाजीवर काम केलं आहे. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलेला क्विंटन डीकॉक आणि रयान रिकल्टनही हे देखील संघात आहेत. इतकंच काय तर संघात शेरफेन रूदरफोर्ड, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे खेळाडू देखील आहेत. या खेळाडूंनी आपआपल्या संघांसाठी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ यावेळी इतर संघांपेक्षा मजबूत दिसत आहे.

मुंबई इंडियन्स संघात आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवलेले ट्रेंट बोल्ट, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर यासारके खेळाडू देखील आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 पाहिली तर सर्वच धुरंधर असल्याचं दिसून येत आहेत.

अशी असू शकते प्लेइंग 11

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक/रयान रिकल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स/नमन धीर/ कॉर्बिन बॉश, मयंक मार्कंडेय/मिचेल सँटनर/अल्लाह गजनफर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट प्लेयर- शार्दुल ठाकुर

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल