AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याला एक चूक नडणार! झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आणि जेतेपद मिळवलं. या विजयानंतर सर्वच खेळाडूंनी जल्लोष करत आनंद साजरा केला. पण हार्दिक पांड्याची आनंद व्यक्त करण्याची पद्धत पाहता पोलिसात तक्रार झाली आहे.

टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याला एक चूक नडणार! झालं असं की...
टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याविरोधात पोलिसात तक्रार, झालं असं की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 12, 2026 | 4:44 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने या जेतेपदासह काही विक्रम रचले. सलग दोनदा जेतेपद, तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ तसेच यजमानपद असताना पहिले जेतेपद मिळण्याचा मान असे अनेक विक्रम नावावर केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. क्रीडाप्रेमींनी नाचत गाजत आपला आनंद साजरा केला. आता चार दिवस झाले असून जेतेपदाचं उत्साह ओसरत चालला आहे. खेळाडूही आपआपल्या घरी परतले आहेत. पण असं असताना अष्टपैलू हार्दिक पांड्या अडचणीत आला आहे. पुण्यातील एका वकिलांना हार्दिक पांड्या राष्ट्रीय ध्वजाचा आपमान केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदानंतर हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत वकील वाजिद खान यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, हार्दिक पांड्याने सामना संपल्यानंतर जल्लोष करताना राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला. पांड्याने एका स्टेजवर राष्ट्रीय ध्वज आपल्या शरीरावर गुंडाळून झोपला होता. त्याच्यासोबत माहिका शर्माही तिथे होती. तक्रार करण्याऱ्या वकिलांनी पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. तक्रारकर्ते वाजिद खान यांच्या तक्रारीनुसार, राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणं ही प्रत्येकी जबाबदारी आहे आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाई झाली पाहीजे.

पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. पण तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. इतकंच काय तर तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. ही घटना अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर घडली होती. बक्षि‍सांचं वितरण झालं होतं. तर सर्व खेळाडू आपआपल्या कुटुंबियांसोबत मैदानावर विजयोत्सव साजरा करत होते. यावेळी हार्दिक पांड्यासोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माही होती. यावेळी हार्दिक पांड्याने तिची गळाभेट घेतली. तिला किसही केलं. तसेच सहकारी खेळाडूंसोबत डान्स करतानाही दिसला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि माहिका ट्रॉफी वितरण करण्यासाठी बांधलेल्या स्टेजवर बसले. यावेळी हार्दिकच्या अंगावर तिरंगा गुंडाळलेला होता. त्यानंतर काही सेकंद दोघेही पोडियमवर झोपले. आता या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल