AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा हॉकीत पुन्हा डंका! जपानला 4-1 ने धूळ चारत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन, सलग तिसऱ्या विजेतेपदाचा विक्रम

अंतिम सामन्यात एकवेळ भारतावर 0-1 अशी पिछाडीवर जाण्याची वेळ आली होती. मात्र, उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी सामन्याचे चित्रच बदलले आणि जपानला 4-1 ने पराभूत करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयात शिलानंद लाक्राची कामगिरीही विशेष ठरली.

भारताचा हॉकीत पुन्हा डंका! जपानला 4-1 ने धूळ चारत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन, सलग तिसऱ्या विजेतेपदाचा विक्रम
India wins Asian Champions Trophy 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 10:13 PM
Share

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात जपानचा 4-1 असा पराभव करत भारताने विक्रमी सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, भारताने सलग तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. मोहाली येथील ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले.

सुरुवातीला पिछाडी, नंतर भारताचा पलटवार

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला काझुमासा मात्सुमोतोने गोल करत जपानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तिसऱ्या क्वार्टरपर्यंत जपानने आपली आघाडी कायम ठेवली. अखेर शिलानंद लाक्राने गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली. 48 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जुगरेज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. विवेक सागर प्रसादने आणखी एक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

एकही सामना न गमावता भारत चॅम्पियन

भारताने स्पर्धेच्या साखळी फेरीतील पाचही सामने जिंकले होते. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 8-1 असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. आता जपानला नमवत भारताने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

भारताने यापूर्वी 2011, 2016, 2018, 2023 आणि 2024 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. आता 2026 मध्ये सहाव्यांदा विजेतेपद मिळवत भारताने नवा विक्रम केला.

शिलानंद लाक्राची संघर्षमय वाटचाल

अंतिम सामन्यात गोल करणारा शिलानंद लाक्रा विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. 2018 मध्ये सुलतान अझलान शाह चषकातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला होता. मात्र, त्याने पुनरागमन करत भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवले. 2025 च्या आशिया चषक विजेत्या आणि यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघातही त्याचा समावेश होता.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?