Dark Circles: डार्क सर्कल्सने हैराण आहात? 800 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रामबाण उपाय ट्राय करा, झटपट होतील गायब
डार्क सर्कल घालवण्यासाठी अनेकजण विविध उपाय शोधत असतात. अनेकजण महागडे ब्युटी प्रोडक्ट शोधत असतात. मात्र असंख्य उपाय केले तरी डार्क सर्कलची समस्या मात्र दूर होत नाही.

Remedy to reduce dark circles? डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कलची समस्या अनेकांना भेडसावत असते. या डार्क सर्कलमुळे चेहरा थकल्यासारखा आणि निस्तेज दिसतो. हे डार्क सर्कल घालवण्यासाठी अनेकजण विविध उपाय शोधत असतात. अनेकजण महागडे ब्युटी प्रोडक्ट शोधत असतात. मात्र असंख्य उपाय केले तरी डार्क सर्कलची समस्या मात्र दूर होत नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर एका आयुर्वेदिक डॉक्टरांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आयुर्वेदिक डॉक्टर हरिप्रसाद शेट्टी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी जायफळ आणि मुलेठीपासून तयार केलेल्या पेस्टचा वापर करण्याचा उपाय सांगितला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय सुमारे 800 वर्षांपासून वापरला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
जायफळ आणि ज्येष्ठमध यांचा वापर शतकानुशतके त्वचेच्या काळजीसाठी केला जात आहे. या दोन घटकांपासून बनवलेली पेस्ट डोळ्यांखालील त्वचेला आराम देण्यास आणि त्वचेची चमक सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे, तुम्ही या दोन घटकांचा वापर करून पेस्ट बनवून काळी वर्तुळे कमी करण्यासाठी ती लावू शकता, असं डॉक्टर हरिप्रसाद शेट्टी यांनी सांगितलं आहे.
ही पेस्ट डोळ्यांखाली कशी लावावी?
- सर्वप्रथम, तुमच्या डोळ्यांखालील त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा.
- आता तयार केलेल्या पेस्टचा अगदी पातळ थर डोळ्यांखालील भागावर लावा.
- ती 5 ते 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर पेस्ट पूर्णपणे सुकण्यापूर्वी थंड पाण्याने हळुवारपणे धुवा.
- आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, तुम्ही ही पेस्ट आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. परंतु ती थेट त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला जळजळ किंवा खाज जाणवत असेल, तर तिचा वापर टाळा.
https://www.instagram.com/reel/DfRzl3ENsc-/?utm_source=ig_web_button_share_sheet
या गोष्टीही लक्षात ठेवा!
- दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घ्या.
- दिवसभर भरपूर पाणी प्या.
- तुमच्या आहारात लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
- दीर्घकाळ मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरणे टाळा.
- याव्यतिरिक्त, तणाव कमी करा.
