AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कारखानदारांबरोबरची बैठक फिस्कटली, सरकारने ४,२०० रुपये दर देण्याचे मान्य केले..

ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी कालपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, या आंदोलनात समेट घडवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदारांची बैठक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

साखर कारखानदारांबरोबरची बैठक फिस्कटली, सरकारने ४,२०० रुपये दर देण्याचे मान्य केले..
Raju Shetti and Hasan Mushrif
| Updated on: Nov 05, 2026 | 11:54 PM
Share

ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी कालपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, या आंदोलनात समेट घडवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदारांची बैठक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून ३९०० रुपये देण्यास सरकार तयार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कारखाना संपल्यानंतर १०० रुपये आणि ४५०० रुपये दरात वर्षभर साखर विकली तर आणखी २०० रुपये जादा देऊ असे ४,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव मुश्रीफ यांनी ठेवला आहे. आता यावर राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे.

आम्ही ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा आवाडे, जिल्हाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्याशी बोलणी केली असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा आंदोलकांनी चार हजार दर सांगितला होता. नंतर राजू शेट्टी, संजय मंडलिक आणि आबिटकर यांच्याशी झालेल्या बैठकीत ३८०० दर ठरला. त्यानंतर पुन्हा प्रकाश अण्णा आवाडे यांनी ३८५० दर मागितला. आज पुन्हा झालेल्या बैठकीत पहिली उचल ३९०० रुपये देण्याचे ठरले. कारखाना संपल्यानंतर १०० रुपये देऊ असे मान्य केले आहे. ४५०० रुपये साखर वर्षभर विकली तर २०० रुपये जादा असे एकूण ४२०० रुपये देण्याचे मान्य केल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यावर आता राजू शेट्टी आणि आंदोलकांनी विचार करुन आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे किणी टोलनाक्यावर (पुणे-बंगळुरू महामार्ग) मोठे आंदोलन सुरू आहे. कालपासून हा रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सोमोरे जावे लागत आहे. मुंबईला जाणारे भाजीपाला आणि दूधाचे टँकर अडवण्याचाही इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलेला आहे.

आज  झालेल्या  बैठकीला आपले आपले लोक गेले होते.  त्यांनी आपण काल ४२००  चा प्रस्ताव दिला होता, त्याचा मुद्दा लावुन धरला. ४२०० च्या प्रस्तावानंतर दिवसभरात काही म्हणत होते चार  हजार एकरकमी देतो आणि दोनशे नंतर देतो. नेट एफआरपीवर ६०० रुपये जास्त द्यायचे.  २४ पैकी ४ ते ५ कारखाने जे डोंगरी भागात आहेत, त्यांची एफआरपी ४ हजारच्या कमी झाली असती. सहा कारखान्यांचे ४३५० पर्यंत गेले असते. आजारी कारखान्यांचा विचार करु असेही सांगितले असे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

मुश्रीफ यांनी वेगळाच फोर्म्युला काढला

मुश्रीफ यांनी वेगळाच फोर्म्युला काढला आहे. त्यांचं डोकंच भारी आहे. काही कारखाने चार हजार द्यायला तयार झाले होते. पण कळपातल्या लोकांनी त्यांनाही पुढे जाऊ दिले नाही. आपले प्रतिनिधी आले की चर्चा करतो आणि सांगतो म्हणाले. ३८०० वरुन ५० रुपये वाढवता. मग आमचे म्हणणेही यांना ऐकावे लागेल. नेमके काय झाले ते आपल्याला चर्चा केल्याशिवाय समजणार नाही असेही राजू शेट्टी यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रस्तावावर म्हटले आहे.

Follow Us
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा