AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : सूर्यासेनेचा वानखेडेत धुमाकूळ, इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाच्या 253 रन्स

India vs England Semi Final T20 Wc 2026 : टीम इंडियाला 250 पार पोहचवण्यात संजू सॅमसन याने प्रमुख भूमिका बजावली. तर इतर फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्यामुळे इंग्लंडसमोर 254 धावांचं आव्हान ठेवता आलं.

IND vs ENG : सूर्यासेनेचा वानखेडेत धुमाकूळ, इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाच्या 253 रन्स
Ishan Sanju Shivam Dube and Hardik PandyaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 05, 2026 | 10:24 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध धमाका केला आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये ओपनर संजू सॅमसन आणि इतर फलंदाजांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 254 धावांचं महाकाय असं आव्हान दिलं आहे. सूर्यासेनेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने या धावांसह असंख्य विक्रम मोडीत काढले आहेत. टीम इंडियाने नक्की काय काय केलं? तसेच कोणत्या फलंदाजाने किती धावांचं योगदान दिलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडियाची बॅटिंग

टॉस गमावल्यानंतर टीम इंडियाची संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली. अभिषेक या सामन्यातून कमबॅक करेल, असं वाटलं होतं. मात्र अभिषेकने पुन्हा निराशा केली. भारताच्या 20 धावा असताना अभिषेक 9 रन्सवर आऊट झाला.

संजू-इशानचा धुमाकूळ

अभिषेक आऊट झाल्यानंतर संजूने इशान किशन याच्या मदतीने धमाका केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी वादळी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी फक्त 45 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. इशानला मोठ्या खेळीची संधी होती. मात्र इशानने फटकेबाजी करुन आपली भूमिका चोखपणे पार पाडली. इशानने 18 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.

संजूचं शतक हुकलं

इशान आऊट झाल्यानंतर संजूने शिवम दुबेसह 22 बॉलमध्ये 43 रन्सची पार्टनरशीप केली. संजूला शतकाची चांगली संधी होती. मात्र संजू आऊट झाला. संजूचं शतक अवघ्या 11 धावांनी हुकलं. संजूने 89 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत जोरदार फटकेबाजी केली.

संजू आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या चौघांनी वादळी खेळी केली. सूर्याने 11, शिवमने 43, तिलकने 21 तर हार्दिकने 27 धावांचं योगदान दिलं. तर अक्षर पटेल 2 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियाने यासह 253 धावांपर्यंत मजल मारली. तर इंग्लंडसाठी आदिल रशीद आणि विल जॅक्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट मिळवली.

विक्रमांची रांग, विंडीजचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान टीम इंडियाने या 253 धावांसह काही ऐतिहासिक असे विक्रम केले. इंडिया 2 वेळा 250 पेक्षा अधिक धावा करणारी दुसरी टीम ठरली. तसेच टीम इंडियाने एका डावात सर्वाधिक 19 षटकार लगावले. तसेच भारताने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत विंडीजच्या सर्वोच्च 205 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. विंडीजने 2012 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 विकेट्स गमावून 205 धावा केल्या होत्या.

Follow Us
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात