AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान

Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान

| Updated on: Jul 23, 2026 | 12:07 PM
Share

NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असली, तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत NEET पेपरफुटी प्रकरणातील खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी यांनी केवळ व्यवस्थेच्या चौकटीत राहून तोडगा निघणार नसल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचे म्हणणे सरकारने ऐकले पाहिजे. त्यांच्या स्पष्ट मागण्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. तोडगा काढायचा असेल, तर केवळ सिस्टिमवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकावा लागेल.”

प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले. “जर सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गंभीर असेल, तर त्यांच्यावर लाठीचार्ज का केला? अश्रुधूराचा वापर का करण्यात आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्या भावना समजून घेत सरकारने संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, संसदेबाहेर विरोधी पक्षांनीही NEET पेपरफुटी प्रकरणावरून जोरदार निदर्शने केली. विविध पक्षांचे खासदार हातात फलक घेऊन संसद परिसरात जमले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर लोकसभेतही विरोधकांनी घोषणाबाजी करत गदारोळ घातल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

Published on: Jul 23, 2026 12:07 PM

Follow Us