AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा

मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा

| Updated on: Jul 23, 2026 | 12:59 PM
Share

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणा करत 26 तारखेला मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भावना आणि संताप सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “26 तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसह शक्तीप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. मुंबईतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्या मनातील राग आणि रोष व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल. हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.”

या मोर्चाची सुरुवात शिवाजी पार्क येथून होणार असून तो सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. सिद्धिविनायक येथे सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात येणार असून त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि ठाकरे बंधूंनी दिलेल्या या घोषणेमुळे 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 23, 2026 12:58 PM

Follow Us