इशान किशन
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याने 2021 साली इंग्लंड विरुद्ध पदार्पण केलं होतं. इशान तेव्हापासून टीम इंडियासाठी खेळत आहे. इशानने टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याची कामगिरी केली आहे. इशान 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप उपविजेत्या संघाचा भाग राहिला. तसेच इशानने 2016 साली अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. इशान देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडसाठी खेळतो. तसेच इशानने आयपीएल या जगातील सर्वात लोकप्रिय टी 20 स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. इशान आयपीएल 2020 विजेत्या मुंबई इंडियन्स या संघाचा भाग होता. मुंबईने इशानला करारमुक्त केल्यानंतर तो सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करतो. तसेच इशानची आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठीही भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
VHT : पहिल्याच दिवशी धुमधडाका, 22 फलंदाजांची शतकी खेळी, सर्वात भारी खेळी कुणाची?
Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील पहिला दिवस फलंदाजांनी गाजवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह एकूण 22 फलंदाजांनी शतक करुन धमाका केला. मात्र एका फलंदाजांनी द्विशतक केलं. कोण आहे तो?
- sanjay patil
- Updated on: Dec 24, 2025
- 9:49 pm
Ishan Kishan World Record : इशान किशनने 14 षटकार मारत ठोकलं शतकं, 5 कोटींसाठी काय पण!
Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्यात सामन्यात धूमधडाका पाहायला मिळाला आहे. शतकी खेळींच्या विक्रमांमुळे विजय हजारे ट्रॉफी पहिल्याच दिवशी गाजली. इशान किशनने 33 चेंडूत शतक ठोकत विक्रम रचला. काय ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 24, 2025
- 5:17 pm