Mumbai Mayor Ritu Tawade | रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना…
मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रितू तावडे यांनी पुन्हा एकदा बांगलादेशीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. महापौर म्हणून पहिलं कोणतं काम करणार याचा मास्टर प्लानच रितू तावडे यांनी आज जाहीर केला.
मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रितू तावडे यांनी पुन्हा एकदा बांगलादेशीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. महापौर म्हणून पहिलं कोणतं काम करणार याचा मास्टर प्लानच रितू तावडे यांनी आज जाहीर केला. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना हा बहुमान मिळवून देण्यासाठी देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला आहे, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम त्यांनीही माझे नाव सुचवले होते. त्यामुळे भाजपची पंरपरा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं. घराणेशाहीला नाही, हे या निवडीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे रितू तावडे म्हणाल्या.
“मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे. माझ्या पहिल्या दिवसापासून मी सांगते की जरी मी महापौर झाले तरी मुंबईची सेवा करणार आहे.” पदभार स्वीकारल्यानंतर, मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करणे हेच माझे प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
Published on: Feb 11, 2026 12:47 PM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

