tv9 Marathi Special Report | फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत; राष्ट्रवादी विलिनीकरणावर खलबतं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीत तडकाफडकी दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे सूत्रांकडून कळते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचीही माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे गुप्तपणे दिल्लीला गेले होते आणि बैठका आटोपून ते मुंबईला परतल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीत तडकाफडकी दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे सूत्रांकडून कळते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचीही माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे गुप्तपणे दिल्लीला गेले होते आणि बैठका आटोपून ते मुंबईला परतल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या विषयावर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विलिनीकरणाचे जे विषय आहेत, ते राष्ट्रवादी पक्षाचे विषय आहेत. त्यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही.”
फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील दिल्लीत दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत काही राजकीय हालचाली सुरू आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Feb 11, 2026 10:46 AM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत

