मुंबई महापौर 2026
मुंबईचे महापौर हे शहराचे पहिले नागरिक आहेत. महानगरपालिकेतील विविध बाबींवर विचारविनिमय करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर होत्या. महापालिकांच्या निवडणुका रखडल्याने प्रशासनामार्फत कारभार सुरू होता. 2026 च्या महापालिकांच्या निवडणुकांनंतर नवीन महापौरांची नियुक्ती केली जाईल.
Read MoreRitu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील वडाळा येथे असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात महाअभिषेक आणि विशेष पूजा पार पडली. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jul 25, 2026
- 12:42 pm
Ritu Tawade | मुंबईचा राष्ट्रीय स्तरावर डंका; अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील महापौर संघटनेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jun 3, 2026
- 11:29 am
Mayor Ritu Tawde | सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार, म्हणाल्या ही केवळ अफवा….
मुंबईत मासेविक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असून, या संदर्भातील वृत्तांवर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मच्छी कापून किंवा साफ करून विकण्यास मनाई करण्यात आल्याची बातमी काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर कोळी बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 7, 2026
- 3:42 pm
Ritu Tawade | महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते, ते विधेयक नामंजूर झाले. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकाचा विरोध केला. काँग्रेसच्या या भूमिकेच्या विरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काळी साडी परिधान करून सभेत येण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Apr 19, 2026
- 1:28 pm
Kishori Pednekar | महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया चर्चेत
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेला लाल दिवा चर्चेचा विषय ठरला आहे. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी नसतानाही हा दिवा लावल्यामुळे रितू तावडेवर टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडेवर थेट टीका केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 1:43 pm
Mumbai Mayor Car | मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौरांच्या अधिकृत वाहनावर लावण्यात आलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने 2017 साली सामान्य सरकारी वाहनांवर लाल आणि निळा दिवा लावण्यास बंदी घातली होती. अशा परिस्थितीत महापौरांच्या गाडीवर लाल आणि निळे दिवे का लावण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 11:11 am
Ritu Tawade | छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
मुंबईत आणि संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात आणि दिमाखात साजरी होत आहे. मुंबईतील महापौर रितू तावडे यांनी शिवजयंतीनिमित्त माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महानगरपालिकेत काम करण्यास आम्ही सज्ज आहेत. महाराजांना अभिप्रेत अशी मुंबई आम्हाला साकारायची आहे आणि त्या कामाला सुरुवात झाली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 19, 2026
- 1:15 pm
tv9 Special Report | मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी
मुंबई महापालिकेत अखेर महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले असून तब्बल 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर खुर्चीवर विराजमान झाला आहे. मात्र पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार घोषणाबाजी होत राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. महापौरपदी रितू तावडे यांनी तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे गटाचे संजय घाडी यांनी शपथ घेतली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 12, 2026
- 11:34 am
Devendra Fadnavis | बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौर म्हणून भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांचा कार्यभार आजपासून सुरु झाला आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 11, 2026
- 2:22 pm
Ritu Tawde Mumbai Mayor : ‘आप इस तरह से’, मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडेंसमोर पहिल्याच दिवशी सभागृहात राडा, काय घडलं?
Ritu Tawde Mumbai Mayor : आज रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदाचा पदभार संभाळला. पहिल्याच दिवशी त्यांना नगरसेवकांचा राडा, गोंधळाला सामोर जावं लागलं. मुंबई महापालिकेत काय घडलं?
- Dinananth Parab
- Updated on: Feb 11, 2026
- 1:44 pm
Mumbai Mayor | मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
मुंबईला आज अखेर महापौर मिळाला आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेना (शिंदे गट) चे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी विरोधात कोणताही उमेदवार नसल्यामुळे रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 11, 2026
- 1:34 pm
Mumbai Mayor Ritu Tawade | रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना…
मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रितू तावडे यांनी पुन्हा एकदा बांगलादेशीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. महापौर म्हणून पहिलं कोणतं काम करणार याचा मास्टर प्लानच रितू तावडे यांनी आज जाहीर केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 11, 2026
- 12:47 pm