Mumbai Mayor | मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
मुंबईला आज अखेर महापौर मिळाला आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेना (शिंदे गट) चे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी विरोधात कोणताही उमेदवार नसल्यामुळे रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला.
मुंबईला आज अखेर महापौर मिळाला आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेना (शिंदे गट) चे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी विरोधात कोणताही उमेदवार नसल्यामुळे रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यामुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात आलं असून महापौर राज सुरू झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. महायुतीने महापौरपदाचे बहुमत असल्याने भाजपला महापौर नेमण्याचा मार्ग मोकळा होता. भाजपने रितू तावडे यांचे महापौर पदासाठी, तर शिंदे सेनेने संजय घाडी यांचे उपमहापौर पदासाठी नाव जाहीर केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संख्याबळाच्या अभावामुळे उमेदवार दिला नाही. रितू तावडे भाजपच्या दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत आणि त्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौरही ठरल्या आहेत. घाटकोपरच्या नगरसेविका असलेल्या तावडे यांनी यापूर्वी महापालिकेत नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे.
Published on: Feb 11, 2026 01:34 PM
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!

