AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England Semi Final Score Updates : इंग्लंडला लोळवून टीम इंडिया अंतिम फेरीत, न्यूझीलंडशी होणार सामना

| Updated on: Mar 06, 2026 | 5:48 AM
Share

India vs England Semi Final Score T20 world cup 2026 and Updates : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने प्रवेश केला आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केलं आहे. भारताने इंग्लंडवर 7 धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे.

India vs England Semi Final Score Updates : इंग्लंडला लोळवून टीम इंडिया अंतिम फेरीत, न्यूझीलंडशी होणार सामना

भारताने टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिले बॅटिंग करताना 253 धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात इंग्लंडला 254 धावाचा पाठलाग करताना 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर जेक बेथल याने 105 धावांची खेळी करुन इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडचे प्रयत्न अवघ्या 7 धावांनी अपुरे पडले. भारताने अशाप्रकारे अंतिम फेरीत धडक दिली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 05 Mar 2026 10:52 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत टीम इंडिया अंतिम फेरीत

    उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला चांगली झुंज दिली. भारताने विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडने 7 गडी गमवून 246 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 7 धावांनी जिंकला. बेथलने भारताच्या नाकी नऊ आणले होते. त्याची विकेट पडली आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला.

  • 05 Mar 2026 10:48 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : बेथलची विकेट टीम इंडियाचा विजय पक्का

    शतकी खेळी करून मैदानात असलेल्या बेथलची विकेट मिळाली आणि टीम इंडियाचा जीव भांड्यात पडला. कारण तो असेपर्यंत टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण 105 धावा करून बाद झाला.

  • 05 Mar 2026 10:42 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : इंग्लंडला सहावा धक्का

    इंग्लंडला सॅम करनच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. सॅम करन 18 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर विकेट मिळाली. अजून इंग्लंडला 9 चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे.

  • 05 Mar 2026 10:40 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : जेकब बेथल शतक, इंग्लंडला विजयासाठी 32 धावांची गरज

    जेकब बेथेलने झुंजार शतक ठोकलं. त्याने 45 चेंडूत शतक ठोकत टीम इंडियाला जेरीस आणलं. इंग्लंडला विजयासाठी 10 चेंडूत 32 धावांची गरज आहे.

  • 05 Mar 2026 10:33 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : इंग्लंडला 18 बॉलमध्ये 45 रन्सची गरज, इंडिया जिंकणार?

    जेकेब बेथेल याने केलेल्या नाबाद 94 धावांच्या जोरावर इंग्लंडला 254 रन्सचा पाठलाग करताना विजयासाठी 18 बॉलमध्ये 45 रन्सची गरज आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

  • 05 Mar 2026 10:16 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : आई शप्पथ, काय कॅच घेतलाय, अक्षर पटेल-शिवम दुबेची अप्रतिम गेमचेंजिग झेल, विल जॅक्स आऊट

    अक्षर पटेल आणि शिवम दुबे या जोडीने अप्रतिम कॅच घेत धोकादायक विल जॅक्स याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अक्षर शिवम या जोडीने घेतलेल्या कॅचमुळे विलच्या खेळाला 34 रन्सवर ब्रेक लावता आला.

    अक्षर-शिवमकडून कडक कॅच

    ॉॉ

  • 05 Mar 2026 09:59 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : जेकब बेथलची विस्फोटक बॅटिंग, टीम इंडियाला टेन्शन

    इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथल याने 19 बॉलमध्ये स्फोटक अर्धशतक झळकावलं आहे. इंग्लंडने अशाप्रकारे 254 रन्सचा पाठलाग करताना 11 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 131 रन्स केल्या आहेत. जेकब बेथल 22 बॉलमध्ये नॉट आऊट 55 रन्स केल्या आहेत. तर विल जॅक्स 13 बॉलमध्ये 16 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 05 Mar 2026 09:41 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : जबरदस्त, टॉम बँटन बोल्ड, अक्षर पटेलला पहिली विकेट

    अक्षर पटेल याने आपल्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवली आहे. अक्षरने टॉम बँटन याला क्लिन बोल्ड करत इंग्लंडला एकूण चौथा झटका दिला. टॉम बँटन याने17 रन्स केल्या.

  • 05 Mar 2026 09:30 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर, जोस बटलर बोल्ड, वरुणकडून शिकार

    वरुण चक्रवर्ती याने टीम इंडियाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर केला आहे. वरुणने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर याला बोल्ड केला आहे. बटलरने 17 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.

  • 05 Mar 2026 09:21 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : जबरदस्त, अक्षर पटेलचा सुंदर कॅच, हॅरी ब्रूक आऊट

    जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने जसप्रीत बुमराह याने टाकलेल्या पाचव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर मोठा फटका मारला. मात्र अक्षर पटेल याने उलट दिशेने धावात अप्रतिम कॅच घेतला. अशाप्रकारे हॅरीच्या खेळीचा 7 धावांवर शेवट झाला.

  • 05 Mar 2026 09:05 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : भारताला मोठं यश, हार्दिककडून फिल सॉल्टची शिकार

    हार्दिक पंड्या याने इंग्लंडला पहिला झटका दिला आहे. हार्दिकने फिल सॉल्टची शिकार केली आहे. हार्दिकने सॉल्टला 5 रन्सवर उपकर्णधार अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

  • 05 Mar 2026 09:01 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात, बटलर-सॉल्ट मैदानात, विजयासाठी 254 धावांचं लक्ष्य

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट  सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 254 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

  • 05 Mar 2026 08:48 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाचं इंग्लंडसमोर 254 धावांचं आव्हान

    भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 253 धावा केल्या. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इतकं मोठं लक्ष्य गाठायचं तर इंग्लंडला पहिल्या षटकापासून आक्रमक खेळी करावी लागेल. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 89 धावा केल्या. त्याने 42 चेंडूत 7 षटकार आमि 8 चौकार मारत या धावा केल्या. शिवम दुबेने 43, इशान किशन 39, हार्दिक पांड्या 27, तिलक वर्मा 21, अभिषेक शर्मा 9, सूर्यकुमार यादव 11 धावा करून बाद झाले.

  • 05 Mar 2026 08:45 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : हार्दिक पांड्या आऊट

    हार्दिक पांड्या 2 धावा घेताना धावचीत होत तंबूत परतला. त्याने या षटकात 2 षटकार मारले होते. हार्दिक पांड्या 27 धावा करून तंबूत परतला असून भारताने 250 पार धावा केल्या आहेत.

  • 05 Mar 2026 08:40 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाला सहावा धक्का, तिलक वर्मा बाद

    तिलक वर्माच्या रुपाने टीम इंडियाला सहावा धक्का बसला आहे. पण तिलक वर्माने झंझावाती खेळी करून गेला. त्याने 6 चेंडूत 21 धावा ठोकल्या. त्याने जोफ्रा आर्चरला तीन षटकार मारले.

  • 05 Mar 2026 08:29 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : शिवम दुबेच्या रुपाने पाचवा धक्का

    शिवम दुबेच्या रुपाने टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याच्या चुकीच्या कॉलचा फटका त्याला बसला. त्याचा डाव 43 धावांवर आटोपला. त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले.

  • 05 Mar 2026 08:25 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : भारताच्या 200 पार धावा, हार्दिक पांड्या-शिवम दुबे मैदानात

    भारताने 17व्या षटकात 200 पार धावा केल्या आहे. भारताने 4 विकेट गमवून हे लक्ष्य गाठलं आहे. अजून 3 षटकांचा खेळ बाकी असून यात आणखी भर पडेल. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे जोडी मैदानात आहे.

  • 05 Mar 2026 08:19 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव यष्टीचीत

    सूर्यकुमार यादव 6 चेंडूत 11 धावांची खेळी करून बाद झाला आहे. आदिल राशीदच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या  चेंडू चुकला आणि यष्टीचीत झाला. जोस बटलरने चूक केली नाही आणि बेल्स उडवल्या.

  • 05 Mar 2026 08:16 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाच्या 15 षटकात 3 बाद 177 धावा

    टीम इंडियाने 15 षटकात 3 गडी गमवून 177 धावा केल्या आहेत. आता टीम इंडिया 200 चा आकडा कधी गाठेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही जोडी मैदानात आहे.

  • 05 Mar 2026 08:04 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाला तिसरा धक्का, संजू सॅमसन 89 धावांवर बाद

    संजू सॅमसनचं वादळ वानखेडेच्या स्टेडियममध्ये घोंगावलं. त्याने 42 चेंडूत 89 धावा केल्या. पण शतक काही पूर्ण करू शकला नाही. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. पण तिथपर्यंत संजू सॅमसनने आपली भूमिका चोख बजावली होती.

  • 05 Mar 2026 07:51 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : इशान किशनच्या खेळीचा शेवट, इंग्लंड विरुद्ध 39 धावा

    टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज इशान किशन याच्या वादळी खेळीचा शेवट झाला आहे. इशान किशन याने इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक सामन्यात 18 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. इशानने या खेळीत 2 सिक्स आणि  4 फोर लगावले.

  • 05 Mar 2026 07:38 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : भावा कडक, संजूचं खणखणीत सिक्ससह सलग दुसरं अर्धशतक

    टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याने इंग्लंड विरुद्ध आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकत अवघ्या 26 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. संजूचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं.

  • 05 Mar 2026 07:29 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : पावरप्ले टीम इंडियाच्या नावावर, संजू-इशानचा तडाखा, किती धावा केल्या?

    टीम इंडियाने अतिशय महत्त्वाच्या सामन्यातली पावर प्ले आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 67 रन्स केल्या आहेत. इशान 16 आणि संजू 41 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 05 Mar 2026 07:22 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : टीम इंडियाचा आक्रमक अंदाज, संजूसोबत इशानचाही तडाखा

    अभिषेक शर्मा 9 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशन याने स्फोटक सुरुवात केली. तर संजू सॅमसन यानेही आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला आहे. टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 55 रन्स केल्या आहेत. इशान 15 आणि संजू सॅमसन 31 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 05 Mar 2026 07:10 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : आक्रमक सुरुवातीनंतर टीम इंडियाला पहिला झटका, अभिषेक शर्मा आऊट

    संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आक्रमक सुुरुवात करुन दिली. या दोघांनी 1.5 ओव्हरमध्ये 20 धावा जोडल्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 9 रन्सवर कॅच आऊट झाला. टीम इंडियाने यासह पहिली विकेट गमावली.

  • 05 Mar 2026 07:02 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Score Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, संजू-अभिषेक मैदानात

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 05 Mar 2026 06:39 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : इंग्लंडची प्लेइंग 11

    इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

  • 05 Mar 2026 06:38 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : भारताची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

  • 05 Mar 2026 06:37 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

    सूर्यकुमार यादव म्हणाला का, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. उपांत्य फेरी, मोठा सामना, आणि वाराही आहे. जास्त दव पडेल असे वाटत नाही. खेळपट्टी चांगली दिसतेय. सर्व क्युरेटर आणि ग्राउंड्समनना याचं श्रेय जाचं. आम्ही त्याच संघासोबत खेळू.

  • 05 Mar 2026 06:36 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : काय म्हणाला कर्णधार हॅरी ब्रूक?

    हॅरी ब्रूक म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. चांगली खेळपट्टी दिसतेय, आशा आहे की आम्ही चेंडूने चांगली सुरुवात करू शकू. या मैदानावर त्यांना आमच्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे. टी20 क्रिकेट हा इतका चंचल खेळ आहे की काय होईल हे तुम्हाला कधीच कळत नाही. आशा आहे की आम्ही त्यांना शांत ठेवू शकू. रेहानऐवजी ओव्हरटन संघात आला आहे.

  • 05 Mar 2026 06:34 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गोलंदाजी निवडली

    नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. कर्णधार हॅरी ब्रूकने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. दव फॅक्टर नसल्याने भारताला फायदा होईल, असं बोललं जात आहे.

  • 05 Mar 2026 06:14 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध भिडणार, थोड्याच वेळात टॉस

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना संध्याकाली 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

  • 05 Mar 2026 06:13 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी इंग्लंड टीम

    टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, बेन डकेट, ल्यूक वूड, जोश टंग आणि जेमी ओव्हरटन.

  • 05 Mar 2026 06:12 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया

    टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.

  • 05 Mar 2026 06:02 PM (IST)

    India vs England Semi Final LIVE Updates : इंग्लंड-इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज

    इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून कोणता संघ अंतिम फेरीत धडक देतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर न्यूझीलंडने बुधवारी 4 मार्च रोजी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे.

Published On - Mar 05,2026 5:58 PM

Follow Us
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना