AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट मुंबई महापौरपदासाठी उमेदवार देणार का? किशोरी पेडणेकर स्पष्टच बोलल्या

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मातोश्रीवरील बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट करत महायुतीच्या उमेदवारीवर सूचक विधान केले आहे.

ठाकरे गट मुंबई महापौरपदासाठी उमेदवार देणार का? किशोरी पेडणेकर स्पष्टच बोलल्या
Kishori Pednekar ritu tawde
| Updated on: Feb 07, 2026 | 1:58 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची आणि नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाची महापौरपदाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ठाकरे गट महापौर देणार की नाही, याबद्दलही सूचक विधान केले.

महापौरांच्या निवडीचा मार्ग मोकळा

किशोरी पेडणकेर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गट मुंबईचा महापौर देणार की नाही, याबद्दल भाष्य केले. आता मराठी महापौर दिला आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि आम्ही ती मान्य केलेली आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. यावेळी त्यांनी महापौरांच्या निवडीचा मार्ग मोकळा असल्याचे संकेत दिले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. २०२२ मध्ये जी काही लढाई सुरू होती. त्या संघर्षातही बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेलं मराठी माणसाचं झाड आजही मुंबईत ताठ मानेने उभं आहे. बाळासाहेबांच्या नावावर मिळालेला जनादेश कोण कशासाठी वापरतंय, हे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आमची लढाई ही नेहमीच मराठी माणसाच्या अस्मितेसाठी होती आणि ती कायम राहील, असे किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितले.

प्रत्येक नगरसेवक प्रभागातील प्रश्न सभागृहात मांडेल

यावेळी त्यांनी महापौरपदासाठी उमेदवार देण्याबाबत थेट भाष्य न करता सक्षम विरोधी पक्ष होण्यावर भर दिला. आता मुंबईला मराठी महापौर मिळणार आहे, त्याचे आम्ही स्वागतच करतो. लोकशाहीत आकड्यांचे महत्त्व आम्हाला ठाऊक आहे. यापूर्वी सत्तेत असतानाही आम्ही अनेकदा जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्षासारखी भूमिका बजावली आहे. आता अधिकृतपणे तीच जबाबदारी आम्ही पार पाडू. कोणताही दबाव किंवा अमिषाला बळी न पडता आमचा प्रत्येक नगरसेवक प्रभागातील प्रश्न सभागृहात मांडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी महापौर निवडणुकीबाबत केलेल्या सूचक विधानाचा संदर्भ देत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “राऊत साहेबांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहेत. येणारा काळच ठरवेल की मुंबईच्या राजकारणाची दिशा काय असेल. मुंबईच्या भल्यासाठी जे जे करावे लागेल, त्यासाठी शिवसेना ठाकरे गट कटीबद्ध आहे, असे किशोर पेडणेकर यांनी सांगितले.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर

दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी महायुतीने आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) कडून संजय घाडी यांची वर्णी लागली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. रितू तावडे या घाटकोपरमधून निवडून आल्या असून त्यांनी यापूर्वी शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?