AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळसाठी अध्यक्ष ठरला? महायुतीकडून आमदाराच्या भावाची जोरदार चर्चा, कोण आहेत अजित नरके?

kolhapur news : कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघासाठी महायुतीचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे. या पदासाठी शिंदे गटाच्या आमदाराच्या भावाच्या नावाची चर्चा आहे.

गोकुळसाठी अध्यक्ष ठरला? महायुतीकडून आमदाराच्या भावाची जोरदार चर्चा, कोण आहेत अजित नरके?
ajit narakeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 8:45 AM
Share

राज्यातील सर्वांचं लक्ष कोल्हापुरातील गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागलं आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ ही महायुतीच्या पारडण्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीचं पारडं जड झाल्याने सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे टेन्शन वाढलं आहे. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या. तर महायुतीने 12 जागा जिंकल्या. परंतु गोकुळच्या दूध महासंघाच्या अध्यक्षनिवडीला कोरमसाठी 14  संचालकाची गरज भासते. परंतु कोणालाही कोरम पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दोन्ही गटासमोर तांत्रिक पेच निर्माण झाला. त्यामुळे गोकुळच्या दूध महासंघावर 4 शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली. या चारही स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देखील बहाल करण्यात आलाय. त्यानंतर आज मंगळवारी गोकुळच्या दूध महासंघाचा अध्यक्ष ठरणार आहे. आजच्या निवडणुकीआधी हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सतेज पाटलांनी विजयानंतर उन्माद केला. त्यामुळेच परमेश्वरानं आम्हाला ही अध्यक्षपदाची संधी दिल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. काल कोर्टाने शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार दिलाय. त्यामुळे अध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे, असंही मुश्रीफ म्हणाले. तर या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांचा पराभव झालाय.

कोण आहेत अजित नरके?

गोकुळचा अध्यक्ष हा चार तज्ज्ञ संचालकांच्या मदतीने होणार आहे. अध्यक्षनिवडीच्या पार्श्वभूमीवर काल महायुतीची एक महत्वाची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शिंदे गटाला द्यावा, असा निर्णय झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सरकारच्या निर्णयावर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा होत्या. त्यामुळे शिंदे गटाला अध्यक्षपद देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी अजित नरके यांच्या नावाची चर्चा होत हे. अजित हे शिंदे गटाचे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आहेत.

Follow Us
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली