AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawan Kalyan: तीन लग्न, तीन घटस्फोट! पवन कल्याण यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा वादळ; पहिल्या दोन पत्नींना किती कोटींची पोटगी?

2023 मध्ये अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'अनस्टॉपेबल विथ एनबीके' या कार्यक्रमात पवन कल्याण यांनी तीन विवाहांवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं होतं. मी तिन्ही महिलांशी एकाच वेळी लग्न केलेलं नाही. नाती टिकली नाहीत म्हणून मला पुन्हा लग्न करावं लागलं, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Pawan Kalyan: तीन लग्न, तीन घटस्फोट! पवन कल्याण यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा वादळ; पहिल्या दोन पत्नींना किती कोटींची पोटगी?
पवन कल्याण आणि त्यांची पत्नीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2026 | 8:40 AM
Share

Pawan Kalyan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या खासगी आयुष्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तब्बल 13 वर्षांच्या संसारानंतर पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी ॲना कोनिडेला यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही संयुक्त निवेदन जारी करत परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, पवन कल्याण यांच्या आयुष्यातील हे पहिलं विभक्त होण्याचं प्रकरण नाही. याआधीही त्यांचे दोन विवाह मोडले आहेत. त्यामुळे त्यांच्या तीन विवाहांची आणि पहिल्या दोन पत्नींना दिलेल्या कथित पोटगीची चर्चा पुन्हा रंगली आहे.

पवन कल्याण आणि ॲना कोनिडेला यांनी 2013 मध्ये विवाह केला होता. ॲना या मूळच्या रशियन नागरिक असून त्यांचं माहेरचं नाव ॲना लेझनेव्हा आहे. 2011 मध्ये ‘तीन मार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याला दोन मुलं असून मुलगी पोलेना अंजना पवनोव्हा आणि मुलगा मार्क शंकर पवनोविच अशी त्यांची नावं आहेत.

आता तेरा वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त निवेदनात त्यांनी एकमेकांबद्दल आदर कायम असल्याचं सांगितलं. लग्न संपले असलं तरी आम्ही चांगले मित्र राहू आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र पार पाडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुलांचं आनंदी आयुष्य आणि त्यांचं कल्याण हेच आमचं प्राधान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या निर्णयामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

पवन कल्याण यांनी 1997 मध्ये नंदिनी यांच्याशी पहिला विवाह केला होता. हा विवाह कुटुंबीयांच्या संमतीने ठरला होता. मात्र, काही काळातच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. 1999 मध्ये ते वेगळे झाले आणि 2008 मध्ये कायदेशीर घटस्फोट झाला. त्यावेळी नंदिनी यांना एकरकमी पाच कोटी रुपये पोटगी दिल्याची माहिती आहे. पहिल्या विवाहानंतर पवन कल्याण यांच्या आयुष्यात अभिनेत्री रेणू देसाई यांची एण्ट्री झाली. दोघांनी 2009 मध्ये विवाह केला. या दाम्पत्याला अकिरा नंदन आणि आध्या अशी दोन मुले आहेत. मात्र, हा संसारही फार काळ टिकला नाही. 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी रेणू देसाई यांनी घटस्फोटाच्या तडजोडीसाठी 40 कोटी रुपयांची मागणी केल्याचं आणि पवन कल्याण ही रक्कम देण्यास तयार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.

तिसऱ्या पत्नीला किती पोटगी मिळणार?

आता ॲना कोनिडेला यांच्यापासूनही पवन कल्याण वेगळे होत असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ॲना यांच्यासोबतच्या घटस्फोटात किती पोटगी दिली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली