Ramayana Collection Day 5: आदिनाथ कोठारे फेम ‘रामायण’ची घोडदौड सुरुच; 5 व्या दिवशी तुफान कमाई, रचला नवा विक्रम
Ramayana Collection Day 5: मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री खास ठरत आहे. अभिनेत्याचा 'रामायण' सिनेमा बॉक्स ऑफिस नवे विक्रम रचताना दिसत आहे. जाणून घ्या पाच दिवसांत 'रामायण' सिनेमाने किती कोटी रुपयांचा विक्रम रचला जाणून घ्या...

Ramayana Collection Day 5: अभिनेता रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री साई पल्लवी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट झाली. पण त्यानंतर सिनेमा बॉक्स ऑफिसवर असलेली पकड आणखी मजबूत झाली. पाचव्या दिवशी तर सिनेमा नवीन आणि मोठा विक्रम रचल आहे, समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या चार दिवसांत सिनेमाने जगभरात 500 कोटींच्या वर कमाई केली असून, पाचव्या दिवशी तर सिनेमाच्या कमाईने आणखी वेग धरला आहे. जाणून घ्या पाचव्या दिवाशी आणि आतापर्यंत किती कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पाचव्या दिवशी ‘रामायण’ सिनेमाने किती कोटी रुपयांची कमाई केली?
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पाचव्या दिवशी ‘रामायण’ सिनेमाने 107.50 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. सांगायचं झालं तर, “देशभरातील 23,862 शोच्या जोरावर सिनेमाने ही कमाई केली आहे. यामध्ये हिंदी व्हर्जनचा वाटा मोठा असून 19,743 शोमधून 87.25 कोटी रुपये वसूल केले आहेत. इतर भाषांमध्ये— कन्नड 7.50 कोटी, तेलगू 6 कोटी, तमिळ 4 कोटी आणि मल्याळम व्हर्जनने सुमारे 2.75 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.
‘रामायणम्’ चे एकूण कलेक्शन किती झालं?
5 दिवसांत ‘रामायण’चं भारतातील नेट कलेक्शन 346.35 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर ग्रॉस कलेक्शनच्या बाबतीत सिनेमा 413.90 कोटी रुपयांच्या टप्प्यावर उभा आहे. जर वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, 4 दिवसांत सिनेमाने 507.20 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं. पाचव्या दिवशी परदेशात सिनेमाने 25 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. म्हणून परदेशातील सिनेमाचा कमाईचा आकडा 250 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे 5 दिवसांत सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन ६६३.९० कोटी रुपये झालं आहे.
‘रामायण’ सिनेमातील महत्त्वाच्या भूमिका…
दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी निर्माते नमित मल्होत्रा आणि यश यांच्यावर होती. तर रणबीर कपूर याने सिनेमा प्रभू राम यांची भूमिका साकारली आहे, तर यश रावणाच्या भूमिकेत आहे. साई पल्लवी हिने माता सिता यांच्या भूमिकेला न्याय दिला असून अभिनेता आदिनाथ कोठारे याने भरत ही भूमिका साकारली आहे. यांच्यासोबतच सिनेमात रवी दुबे लक्ष्मण, अरुण गोविल राजा दशरथ, इंदिरा कृष्णन कौशल्या, लारा दत्ता कैकेयी, शीबा चड्ढा मंथरा, रकुल प्रीत सिंह शूर्पणखा आणि काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेत दिसत आहे.
