विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण…शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजितदादांच्या विमान अपघाता संदर्भात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. या संदर्भात या नेत्याने जर रामदास कदमांकडे पुरावे असतील तर त्यांनी सीबीआयच्या सुपूर्द करावेत असेही म्हटले आहे.

शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी जसे इतर नेते आले तसेच पार्थ पवार देखील आले होते. रोहित पवार देखील साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, बैठका घेण्याचे आमचे आधीच ठरले होते. आता आम्ही देखील दोन दिवसांनी परत भेटणार आहोत. रोहित पवार उद्या एक दिवस दिवाळीसाठी घरी जाणार आहेत, मात्र, यात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने म्हटले आहे.
दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा त्यावेळी झाली होती, आम्ही पुढाकार घेतला होता. परंतू समोरुन काही प्रस्ताव आला नाही म्हणून आम्ही थांबल्याचे शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाल्याने आता पुन्हा नेते भेटायला येत आहेत. प्रफुल पटेल यांना दहा तारखेनंतर भेटायला या असा निरोप दिला होता. त्यामुळे ते भेटायला येत आहेत. कोणाच्या डोक्यात आता काय चाललं आहे हे कसं कळणार, कारण राजकारणात असे जर तरला काही अर्थ नसतो असेही शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजितदादांच्या विमान अपघाता संदर्भात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. यावर शशिकांत शिंदे म्हणाले की रामदास कदम यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सीबीआयकडे सुपूर्द करावे. सीबीआयकडून आम्हाला तपासाची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.
सरकारला अधिपत्य गाजवायचे आहे
गोकुळ दूध महासंघाच्या निवडणूक प्रकरणात आज मोठा मोर्चा निघाला होता. मात्र कोर्टाने आदेश दिला तर तशी कारवाई आता होणार आहे. मात्र, सरकारने ज्या प्रकारे निर्णय घेतला आहे, त्यात एक दिसून येत की सरकारला अधिपत्य गाजवायचे आहे. फक्त निवडणूक आहे म्हणून चार स्वीकृत सदस्यांना अधिकार द्यायचा हे काही योग्य नाही असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
