AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare: रामदास कदमांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सुनील तटकरे संतापले! म्हणाले, ‘आग्र्यात उपचार..’

रामदास कदम यांची मानसिकस्थिती पाहता ठाण्यापेक्षा आग्र्याला मानसोपचारतज्ज्ञ चांगले आहेत तिथे नेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करावेत, असही सुनील तटकरे यावेळी म्हणाले.

Sunil Tatkare: रामदास कदमांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सुनील तटकरे संतापले! म्हणाले, 'आग्र्यात उपचार..'
Image Credit source: Sunil Tatkare| Twitter
| Updated on: Nov 09, 2026 | 9:29 PM
Share

दिपक दपके, प्रतिनिधी टीव्ही9 मराठी: 

Sunil Tatkare ON Ramdas Kadam:  जागतिक किर्तीचे थोर विचारवंत, थोर समाजसेवक रामदास कदम यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अलिकडच्या काळात रामदास कदम यांची मानसिकस्थिती पाहता ठाण्यापेक्षा आग्र्याला मानसोपचारतज्ज्ञ चांगले आहेत तिथे नेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करावेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?

“अंतुले साहेबांनी माझ्यावर प्रेम केलं, कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला संधी दिली. त्यांचा मी आदर करतो मात्र मी त्यांचा पीए कधीही नव्हतो. याउलट धर्मांधांनी त्यांच्यावर जे किती गरळ ओकली ते सर्वांना माहित आहे. त्यामुळे अंतुले साहेबांबाबत बोलण्याचा अधिकार रामदास कदम यांना नाही. बाकीच्या आरोपांबाबत मी कायदेशीर नोटीस देणार आहे. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा उबाठाचे नेते रामदास परब यांनी जे आरोप केलेत त्याची आधी त्यांनी उत्तरे द्यावीत,” असं आव्हान सुनील तटकरे यांनी केले.

रामदास कदम माझ्या हातापाया पडले! 

तसेच  “मी याआधी कधीही कैफियत मांडली नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान या सर्वांना सुनील तटकरेची पार्श्वभूमी माहिती आहे. रामदास कदम यांना मी एवढंच विचारतो, नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र आले होते तेव्हा हेच रामदास कदम सुनील तटकरेकडे आले, माझ्या हातापाया पडले, माझ्यासोबत गाडीत आले मी त्यांना अजित पवारांकडे घेऊन गेलो, तेव्हा ते विरोधीपक्षनेते झालेत. रामदास कदम जागृत देवस्थानच्या परिसरात राहतात तिथे येऊन त्यांनी सांगावं मी खोटं बोलतोय,” असे  म्हणत सुनील तटकरेंनी रामदास कदम यांच्या टिकेचा समाचार घेतला.

विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला अशी स्पष्ट भूमिका सुनील तटकरे यांनी घेतली आहे.  दादा असते तर 12फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला असता. असं म्हणत सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर पडदा पाडला आहे. तसेच योग्यवेळी सर्वकाही सांगेन असं म्हणत मला केव्हा काय बोलायचं ते कळतं. असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Follow Us
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!