AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : घरात पैसा टिकत नाही? मग करा फेंग शुईमधील सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. ज्याप्रमाणे घरात निर्माण होणाऱ्या वास्तुदोषासाठी वास्तुशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत, त्याच प्रमाणे फेंग शुईमध्ये देखील काही छोटे-छोटे उपाय सांगण्यात आले आहेत. घराला बरकत प्राप्त व्हावी, हातात पैसा टिकावा यासाठी आज आपण फेंग शुईमधील काही उपाय जाणून घेणार आहोत.

Feng Shui : घरात पैसा टिकत नाही? मग करा फेंग शुईमधील सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
Feng Shui Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 9:16 PM
Share

फेंग शुई हे देखील एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईचा उगम हा चिनमध्ये झाला. मात्र त्यानंतर फेंग शुईचा प्रसार हा हळुहळु संपूर्ण जगभरात झाला. आज जगातील असे अनेक देश आहेत, जिथे फेंग शुई शास्त्रामधील उपाय केले जातात. अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते पैसा कमावण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, परंतु तरी देखील त्यांच्या हातात पैस टिकत नाही. पैसा हातात तर येतो मात्र कोणत्या न कोणत्या कारणांमुळे पैसा लगेच खर्च होतो. महिन्याच्या शेवटी अशा लोकांची तिजोरी रिकामी असते, असं घडू नये, हातात पैसा टिकून राहावा, यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी येते, गरज नसलेल्या खर्चाला आळा बसतो आणि हातात पैसा टिकून राहतो, अशी मान्यता आहे. आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

पाकिटात या वस्तू ठेवू नका – अनेकांना आपल्या पाकिमध्ये विविध वस्तू ठेवण्याची सवय असते, ज्यामध्ये जुन्या नोटा, जुनी बिलं, तसेच चलनात नसलेली नाणी, आपल्या पूर्वजांचे फोटो अशा अनेक वस्तू पाकिटात ठेवल्या जातात. परंतु फेंग शुईनुसार आपल्या पाकिटात कधीही चलनात नसलेली नाणी, फाटलेल्या नोटा किंवा जुनी बिल ठेवू नयेत, ज्याचा नकारात्मक प्रभाव पडतो, परिणामी तुमच्या हातात पैसा टिकत नाही.

फेंग शुईनुसार पाकिटात कधीही धारदार वस्तू देखील ठेवू नयेत, पाकिटात पैसा ठेवताना नेहमी ते चढत्या क्रमाने ठेवावेत जसं की सगळ्यात आधी दहाची नोट, नंतर शंभरची नोट, नंतर पाचशेची नोट या क्रमाने पैसे ठेवावेत असा सल्ला देखील फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. तसेच कोणाकडूनही उसणे दिलेले पैसे घेताना नेहमी उजव्या हातानेच पैसे घ्यावेत असंही फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!