AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adinath Kothare : मेहनत फळाला आली! ‘रामायण’ सिनेमातील भरतच्या भूमिकेसाठी आदिनाथ कोठारेनं केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, म्हणाला…

Adinath Kothare : आदिनाथ कोठारेनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली असून अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे.

Adinath Kothare : मेहनत फळाला आली! 'रामायण' सिनेमातील भरतच्या भूमिकेसाठी आदिनाथ कोठारेनं केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, म्हणाला...
| Updated on: Nov 09, 2026 | 9:15 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे सध्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटात आदिनाथ भरतची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा भाग होणं आदिनाथसाठी अत्यंत खास अनुभव ठरला आहे. आदिनाथनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून त्यानं या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येतेय. आदिनाथचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

आदिनाथ कोठारेची पोस्ट

आदिनाथनं ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रवासाबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. आदिनाथनं सांगितलं की, एखाद्या भूमिकेत शिरणं आणि तिची गोष्ट समजून घेणं, हा प्रवास अंतिम परिणामापेक्षा अधिक रोमांचक असतो. या प्रक्रियेतले पडद्यामागचे क्षण कलाकारांसाठी अत्यंत खास असतात. उत्सुकता, समाधान, असमाधान, काहीतरी नवीन करण्याची धडपड, अस्वस्थता, एकाग्रता, चिंता आणि उत्साह अशा अनेक भावनांचा अनुभव या प्रवासात येतो.

दिग्दर्शकाने शूटिंग संपल्याचं जाहीर केल्यानंतर एक प्रकारची पोकळी निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी नव्या प्रवासाची गरज असते. अशा सर्जनशील प्रवासांमधील शांत वेळेत कलाकाराला संयम आणि कृतज्ञता या गोष्टी शिकाव्या लागतात, असं आदिनाथनं शेवटी म्हटलं आहे. अभिनेत्यानं पुढे चाहत्यांना ‘रामायण‘ हा सिनेमा बघण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, ‘रामायण‘ या सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या सिनेमानं प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी भारतात 56.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटानं परदेशात 45 कोटी रुपये कमावले आहेत. या कमाईसह, चित्रपटानं चार दिवसांत 238.35 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, त्याची एकूण कमाई 285 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. परदेशात चित्रपटानं 214 कोटी रुपये कमावले असून, त्याची जगभरातील एकूण कमाई 499.20 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रणबीर कपूरच्या करिअरमधील ‘रामायण’ हा सध्या त्याचा तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

Follow Us
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!