Gokul: ‘गोकुळ’च्या अध्यक्षाचा आज फैसला, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील, कोण बाजी मारणार?
Gokul President Election Today: 500 कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या, गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला होणार आहे. शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील, कोण बाजी मारणार?

Gokul President Election: कोल्हापूर दूध उत्पादक संघ, गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला होणार आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. कोरम अभावी यापूर्वीची सभा तहकूब झाली होती. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शशिकांत पाटील-चुयेकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचेय पुत्र रणजीतसिंह पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. शासन नियुक्त चार सदस्य या सभेत मतदानाचा हक्क बजावतील यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या फैसल्यानंतर स्पष्ट झाले आहे.
चार सदस्य फिरवणार पारडे?
गोकुळच्या निवडणुकीनंतर 29 ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी सभा झाली होती. पण त्याला महायुतीच्या 12 संचालकांनी पाठ फिरवली होती. कोरम अभावी ही सभा तहकूब झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीचे आदेश दिले. आत आज तरी महायुतीचे संचालक सभेला उपस्थित राहणार का? याची उत्सुकता आहे. सरकारने अध्यादेश काढत विविध क्षेत्रातील चार जणांची शासकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. आता हे चार सदस्य कुणाच्या बाजूने पारडे फिरवणारे याची मोठी चर्चा आहे.
औरंगाबाद खंडपीठाचा आदेश काय?
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गोकुळ दूध संस्थेच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालय महत्त्वपूर्ण निकाल देताना उद्याच्या होणाऱ्या अध्यक्षपदाची निवडणूक रोखण्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तसेच शासनाने नेमलेल्या चार सदस्यांबाबतचा अध्यादेश चूक आहे की बरोबर हे अंतिम निकालात ठरेल. विशेष म्हणजे निवडून आलेले 25 सदस्य आणि सरकारने नेमलेले चार सदस्य देखील, म्हणजेच 29 सदस्य मतदान करतील. पण यावेळी शासनाने नेमलेले चार संचालकांची मत वेगळी ठेवली जाणार आहे. तसेच त्यांचे बॅलेट पेपर जपून ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत 25 सदस्यांना निवडणुकीबाबत यापूर्वीच निवडणुकीत मतदान करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे, इतर चार सदस्यांना नोटीस देण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी घेतील. कायद्याप्रमाणे त्यांना अधिकार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे, त्यामुळे उद्या ते 4 सदस्य मतदान करणार का? पाहावे लागणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे…
गोकुळच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार
नियमानुसार निवडणूक होणार
निवडून आलेले 25 सदस्य आणि शासनाने नेमलेले 4 सदस्य म्हणजेच 29 सदस्य मतदान करतील
शासनाने नेमलेले चार सदस्यांचे मतदान वेगळं ठेवलं जाणार
25 वोट्स वेगळी बॉक्समध्ये ठेवणार आणि नेमलेले 4 वोट्स वेगळी बॉक्समध्ये ठेवणार
जर 29 मतदान झाल्यास निकाळावेळी सगळे वोट एकत्र मोजणार
पुढची सूनवणी 25 नोव्हेंबरला होणार आहे
नाहीतर प्रशासक आला असता-धनंजय महाडिक
आमच्यापेक्षा केवळ एकच जास्त सदस्य त्यांचा निवडून आला. मात्र साडेपाच लोकांचा पाठिंबा असल्याचा कांगावा त्यांनी केला. आम्ही रस्ता आणि कोर्टातील लढाई लढल्या. तीन सभा तहकुभ झाल्या असत्या तर प्रशासक आलं असतं आणि आम्हाला हे सहज करता अलं. संचालक नेमल्यामुळे आता २५ लोकांमधूनच अध्यक्ष होणार. मविआतील लोकांनी केवळ फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं. सहकारात कोरम अभावी सभा होऊ शकते का हे सगळ्यांना माहिती आहे. कोणत्याही संस्था बायलॉजच्या आधारे चालते. मात्र शासन हे रद्द करु शकते असा फेक नरेटिव्ह सतेज पाटलांनी केला. आजच्या मोर्चात बाहेरचेच लोक जास्त होते, असा आरोप धनंजय महाडिक यांनी केला.
