AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करा, सिटी इन हॉटेलमध्ये घडलं काय? रामदास कदमानंतर शिंदे सेनेचा हा आमदार मैदानात

Ajit Pawar Sunil Tatkare Ramdas Kadam: अजितदादांच्या अपघाताबाबत पुन्हा राजकीय धुमश्चक्री उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांच्यानंतर आता हा आमदारही मैदानात उतरला आहे.

Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करा, सिटी इन हॉटेलमध्ये घडलं काय? रामदास कदमानंतर शिंदे सेनेचा हा आमदार मैदानात
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करा
| Updated on: Nov 10, 2026 | 6:35 AM
Share

Mahendra Thorve on Sunil Tatkare: माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर अपघात झाला. या अपघातात दादांसह पायलट कॅप्टन सुमिती कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदिप जाधव आणि पिंकी माळी यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आणि दावा गेल्या सहा महिन्यात सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात सोमवारी बॉम्ब टाकला. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांना याच माणसाने संपवलं. जो जो माणूस तटकरेंना जवळ करतो, त्यालाच संपवण्याचे काम हा माणूस करतो, असे खळबळजनक वक्तव्य कदम यांनी केले होते. त्यांच्यानंतर आता आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा मोठे वक्तव्य केले. अजितदादांच्या घातपाताबाबत तटकरेंची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सिटी इन हॉटलेमध्ये काय घडलं?

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरून आता नवा वाद पेटला आहे. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत त्यांनी राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेवर आणि त्यावेळच्या राजकीय हालचालींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांना कुठेही बोलावले जात नव्हते. पवार कुटुंबीय आणि त्यांचे विश्वासू नेते एकत्र बसून चर्चा करत होते, असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.

तसेच अजितदादांचे अपघाती निधन झाल्यानंतर सिटी इन हॉटेलमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

दादांच्या घातपाताची चौकशी करावी

अजितदादांच्या अपघाती निधनामागे घातपात होता का आणि या प्रकरणात सुनील तटकरे यांची काही भूमिका होती का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली. या आरोपांबाबत कोणताही निष्कर्ष अद्याप सिद्ध झालेला नसून, संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका आणि तपास यंत्रणांची माहिती महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

विलीनीकरणाविषयी सुनील तटकरे जे बोलत आहेत ते धादांत खोटं आहे. आमदार रोहित पवार यांनी जी शंका उपस्थित केली आहे, ती देखील खरी आहे. याविषयी सुनील तटकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे सेनेचे आमदार थोरवे यांनी केली आहे. यामुळे आता हा वाद अजून तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!