Ritu Tawade | छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
मुंबईत आणि संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात आणि दिमाखात साजरी होत आहे. मुंबईतील महापौर रितू तावडे यांनी शिवजयंतीनिमित्त माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महानगरपालिकेत काम करण्यास आम्ही सज्ज आहेत. महाराजांना अभिप्रेत अशी मुंबई आम्हाला साकारायची आहे आणि त्या कामाला सुरुवात झाली आहे.
मुंबईत आणि संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात आणि दिमाखात साजरी होत आहे. मुंबईतील महापौर रितू तावडे यांनी शिवजयंतीनिमित्त माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महानगरपालिकेत काम करण्यास आम्ही सज्ज आहेत. महाराजांना अभिप्रेत अशी मुंबई आम्हाला साकारायची आहे आणि त्या कामाला सुरुवात झाली आहे. तशी प्रेरणा घेऊन आम्ही पुढे निघणार आहोत असं रितू तावडे म्हणाल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे महापौरांना बोलावून महाराजांच्या चरणी फुल अर्पण करण्याची संधी दिली गेली, ज्याबद्दल रितू तावडे यांनी आभार व्यक्त केले. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम, स्मारक भेटी आणि फुलार्पणाने वातावरण भक्तिभावाने भरलेले आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...

