KDMC Air Pollution | कल्याण-डोंबिवलीत वायूप्रदूषण वाढले; AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
कल्याण-डोंबिवली परिसरातील हवेची गुणवत्ता सध्या खराब श्रेणीत पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 150 ते 190 दरम्यान नोंदवला गेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करत काही ठिकाणी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरातील हवेची गुणवत्ता सध्या खराब श्रेणीत पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 150 ते 190 दरम्यान नोंदवला गेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करत काही ठिकाणी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्लांटमधून मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरातील वायूप्रदूषणात अधिक भर पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण पसरवणाऱ्या प्लांट्सवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Published on: Mar 05, 2026 05:41 PM
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय

