राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
महाराष्ट्र राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. सात जागांसाठी होणारी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
शरद पवार यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीकडे अधिक संख्याबळ असल्यामुळे सहा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. जर आठवा अर्ज आला तरच निवडणूक होईल, अन्यथा ही निवडणूक बिनविरोध पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून चार उमेदवार, तर शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे आणि महायुतीतील इतर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

